oil.jpg 
पुणे

....म्हणून बाजारात निर्माण झालाय खाद्यतेलाचा तुटवडा

प्रवीण डोके

मार्केट यार्ड (पुणे) : देशात खाद्यतेलाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. परंतु, यावर्षी लॉकडाऊनमुळे पन्नास टक्क्यांनी आयात घटली आहे. त्यामुळे सध्या मागणी अधिक आणि आयात कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून शहरासह राज्यात विविध प्रकारच्या खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या भावात लक्षणीय वाढ झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तुटवड्यामुळे पाम तेलाच्या डब्यामागे 100 रूपयांची वाढ झाली आहे. सूर्यफुलाच्या तेलाच्या डब्याच्या दरात 50 रूपये, तर सोयाबीन तेलाच्या दरात 30 रूपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातही किलोच्या दरात 5 ते 10 रूपयांची वाढ झाली आहे. ही वाढ आणखी काही काळ कायम राहणार असल्याची माहिती व्यापारी रायकुमार नहार यांनी दिली.

नहार म्हणाले, कोरोनामुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे आणखी दोन महिने सर्व प्रकारच्या तेलाचा काही अंशी तुटवडा जाणवणार आहे. शहरातील हॉटेल्स, खानावळी, विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून पाम तेलाला मागणी असते. तर घरगुती ग्राहकांकडून सूर्यफुल आणि शेंगदाणा तेलाला मागणी असते.

इंडोनेशिया, मलेशिया, अर्जिटिना आणि युक्रेन या देशातून खाद्यतेलाची आयात होते. 

  •  देशात दर वर्षी एकूण मागणीच्या सुमारे 70 टक्के खाद्यतेलाची आयात
  • देशात मागणीच्या 30 टक्के खाद्यतेलाची निर्मिती
  • मे 2019 मध्ये देशात 8 लाख टन तेलाची आयात
  • मे 2020 मध्ये कोरोनामुळे 4 लाख टनच तेलाची आयात
  • आयातीचे प्रमाण तब्बल 50 टक्क्यांनी घटले
  • लॉकडाऊनमुळे राज्यातील तेल निर्मिती करणारे कारखाने अद्याप बंद 
  • या सर्वांच्या परिणामामुळे मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाचा काही अंशी तुटवडा


घाऊक व किरकोळ बाजारातील तेलाचे दर
तेल घाऊक (15 लि.) किरकोळ (किलोचा दर)
पाम 1310 (80)
सोयाबीन 1300-1470 (88)
सूर्यफुल 1440-1550 (97-107)
शेंगदाणा 2100 (156)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT