Flex news 
पुणे

Shrikant Shinde: उद्धव ठाकरेंच्या टीकेचे पुण्यात पडसाद; झळकले 'दुखावलेला बाप'चे फ्लेक्स

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाचे दसरा मेळावे बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव यांनी घरणेशाही आणि नातवावरून शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना 'एक दुखावलेला बाप' या आशयाचे भावनिक पत्र लिहिले आहे. या टीकेचे पडसात पुण्यातही उमटले असून पत्राचे फ्लेक्स पुण्यातही झळकले आहेत. (Shrikant Shinde news in Marathi)

उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याच्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर खोचक शब्दात टीका करत म्हणाले की, "बाप मंत्री, कारटं खासदार. कोणाचा आमदार पुन्हा डोळे लावून बसले नातू नगरसेवक. अरे त्याला मोठा तर होऊदे शाळेत तर जाऊदे आत्ताच नगरसेवक. सगळं माझ्याचकडे पाहीजे....".

श्रीकांत शिंदे यांच्या पत्राचे फ्लेक पुण्यात झळकले आहेत. एक दुखावलेला बाप नावाचे फ्लेक्स पुण्यातील बालगंधर्व परिसरात लावण्यात आलेले आहे. युवा सेनेकडून बालगंधर्व चौकात हे फ्लेक्स लावण्यात आले. शिंदे यांच्या पत्राचा मजकूर होर्डिंग्जमध्ये छापलेला आहे.

श्रीकांत शिंदे पत्र लिहून म्हणाले होते की, महाराष्ट्रानं जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित मनानं आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. हे पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या ‘खासदार मुला’चं नाही; हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या दीड वर्षाच्या निरागस, चिमुकल्याच्या ‘बापा’चं. माझं हे पत्र तुम्ही नीट, सहृदयतेनं पूर्णपणे वाचावं, अशी तुम्हाला सुरुवातीलाच हात जोडून विनंती.

तुम्ही तुमची पातळी सोडलेली असली तरी आम्ही सोडलेली नाही नि सोडणारही नाही. म्हणूनच एक सांगतो. उद्धवजी, तुम्हीही पुढच्या काळात आजोबा व्हाल. तुमच्या लाडक्या नातवाचं, नातीचं कौतुक कराल. त्यांच्या डोळ्यांतील निरागसता पाहून तुमचंही मन आनंदानं भरून जाईल. कल्पना करा उद्धवजी, त्या तुमच्या नातवाबद्दल, नातीबद्दल तुम्ही जे काल बोललात तसं कुणी बोललं तर काय अवस्था होईल तुमची नि तुमच्या कुटुंबीयांची. देव करो नि तसं त्यांच्याबद्दल कुणीही न बोलो, ही माझी- एका बापाची – मनापासूनची सदिच्छा, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

SCROLL FOR NEXT