shubham mane.jpg 
पुणे

फ्रान्समध्ये अडकला होता पुण्यातील तरुण; सुरेश प्रभू यांनी उचलले `हे` पाऊल

अन्वर मोमीन

वडगाव शेरी (पुणे) : लॉकडाउनमुळे संपूर्ण जगामध्ये लोक जागोजागी अडकून पडले आहेत. भारतातील अनेक विद्यार्थी परदेशात अडकले आहेत. खराडी येथील शुभम माने हा विद्यार्थी सुद्धा फ्रान्समध्ये अडकला होता. मात्र, खासदार सुरेश प्रभू यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शुभम दोन दिवसांपूर्वी भारतात सुखरूप परतला.

पुण्यातील चंदननगर (खराडी) येथील सामाजिक कार्यकर्ते संजीव राम माने यांचा मुलगा फ्रान्स येथे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात इंटरंशिप करत होता. त्याची इंटरंशिप संपायची वेळ आली आणि फ्रान्समध्ये कडक लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे जागतिक विमानसेवा संपूर्ण बंद झाली व शुभम फ्रान्समध्ये अडकला गेला. तब्बल दोन महिने तेथे अडकल्यामुळे त्याच्याकडचे पैसेही संपत आले होते. घरची परिस्थिती मध्यमच. रात्रंदिवस कुटुंब अस्वस्थ होऊन परमेश्वराचा धावा करत होते काही राजकीय पुढाऱ्यांना भेटून याबाबत मदत करण्याची विनंती करत होते पण जागतिक लेव्हलचे काम असल्यामुळे परिस्थितीत काही सुधारणा होत नव्हती.

अशातच त्यांनी विश्वशक्ती इंटरनॅशनल फाऊंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांच्याशी संपर्क साधून सविस्तर वृत्तान्त सांगितला. डॉ. दत्ता कोहिनकर यांनी त्वरित राज्यसभा सदस्य व माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संपर्क साधला व शुभमला मदत करण्याची विनंती केली .

सुरेश प्रभू यांनी त्वरित फ्रान्स अॅम्बॅसीशी संपर्क साधला व शुभमला मदत करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले. सुरेश प्रभू यांच्या फोनमुळे फ्रान्स अॅम्बॅसी मधून शुभमला आवश्यक मदत करून लवकरात लवकर निघणाऱ्या विमानात प्रवेश देण्याचे आश्वासन दिले व त्याला वैयक्तिक मदतही केली. अखेर आज सकाळी शुभम संजीव माने मायदेशी परतला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मूळचे मदनसुरी (ता . निलंगा) येथील आणि आता पुणे येथे स्थायिक झालेले माने कुटुंबांनी अश्रू ढाळत सुरेश प्रभूंविषयी आपल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या. शुभम म्हणाला, `सर्वकाही सोपस्कार वेळीच पार पडल्यामुळे मी भारतात सुखरूप परतू शकलो. मला मदत करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो.`

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT