bandhara
bandhara 
पुणे

सिध्देश्वर निंबोडी येथील बंधाऱ्यात सोडले पाणी, ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त

संतोष आटोळे

शिर्सुफळ (पुणे) : सिध्देश्वर निंबोडी (बारामती) येथील पारवडी कडुन येणाऱ्या ओढ्यावर बांधण्यात आलेले बंधाऱ्यामध्ये तसेच पुढे मदनवाडी तलावात खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यात आले.यामुळे बंधारे भरुन वाहत लागले आहेत. याबाबत दै.सकाळने दोन दिवसापूर्वीच सचित्र वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत बंधारे भरल्याने ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

सन 1972 च्या दुष्काळात बांधण्यात आलेला व सुमारे 170 हेक्टर क्षेत्रात पसरलेला मदनवाडी तलावात दरवर्षी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर अडविले जाते.त्यानंतर खडकवासला कालव्यातुन येणाऱ्या पाण्याचा आधार या तलावाला असतो. यामध्ये शेटफळकडुन तसेच पारवडीकडुन पाणी सोडण्याचे मार्ग आहेत. पारवडी कडुन येणाऱ्या ओढ्यावर गावच्या हद्दीत चार बंधारे आहेत ते चारही बंधारे यंदा कोरडे पडले होते.

यामुळे सध्या खडकवासला कालव्यातुन सोडण्यात आलेल्या पाण्याच्या माध्यमातुन, बंधारे, तलाव प्राधान्याने भरण्याची मागणी माजी सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते, किशोर फडतरे, सुनिल उदावंत, संपत सवाणे, संतोष नगरे, धनंजय धुमाळ यांच्यासह ग्रामस्थांनी केली होती.याबाबत दै.सकाळ मध्ये सचित्र वृत्त प्रसिध्द केले होते.याची दखल घेत पाणी सोडण्यात आले. बंधाऱ्यात पाणी सोडल्यात आल्याने गावाच्या पाणी पुरवठा योजनेसह गावचा पाणीप्रश्न, आसपासच्या परिसरातील चारा पिकांसह इतर पिकांच्यासाठी याचा फायदा होणार आहे. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT