marrige1.jpg 
पुणे

ना बॅंण्डबाजा, ना वरात...! लाॅकडाउनमधील लग्नांचा आळंदी पॅटर्न

विलास काटे

आळंदी (पुणे) : डीजे नाही.. परण्या नाही.. वरात नाही.. अन् गोरज मुहूर्तही नाही, असा सगळा विवाह सोहळ्यातील डौमडौल टाळून आळंदीच्या पूर्व पट्ट्यातील शेतकरी वर्ग मुलामुलींचे विवाह करू लागले. अत्यल्प खर्चात आणि केवळ घरच्याच मंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळे सध्या सुरू झाल्याने वेगळाच आदर्श आळंदी आणि परिसरातील शेतक-यांना समाजापुढे ठेवला आहे.

पूर्व पट्ट्यातील शेतक-यांचा या लग्नाच्या आळंदी पॅटर्नचीच चर्चा सध्या होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचा एक नव्हे तर तब्बल चौथा टप्पा सुरू आहे. आणखी लॉकडाउन किती काळ चालणार याचा नेम नाही. मुला- मुलींचे लग्न तर ठरवले. मुहूर्तही ठरला.पण लॉकडाउनमुळे पुढे काहीच करता येईना. आता तर मुहूर्तही संपत चालले. मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यांना बंदी आहे. त्यामुळे लग्नोच्छूक मंडळी विवंचनेत होती. मग गावातील काही लोकांनी एकत्रित येवून साध्या पद्धतीने लग्न लावण्याचा निर्णय घेतला. आता लग्नासाठी महागडा बस्ता नाही. भांडी खरेदी नाही. ना दागिन्यांचा डामडौल. साध्या पद्धतीने लग्न लावली जात आहे.


कर्ज काढून किंवा जमिन विकून काही मंडळी आनंदाने पैपाहूण्यांना बोलावून थाटामाटात विवाह करत. मात्र यंदाच्या वेळी थाटमाट काही दिसून आला नाही.पत्रिकाही न छापता लग्ने पार पडली. आळंदी परिसरातील धानोरे, मरकळ, केळगाव, रासे, वढू, सोळू गावात पंधरा ते वीस जणांचे विवाह अशा साध्या पद्धतीने लागल्याने चर्चेचा विषय झाला. 

नियोजित विवाह आता जेमतेम व-हाडी मंडळींच्या उपस्थितीत साजरा करण्याचा आळंदी पॅटर्न आता आळंदी आणि परिसरात सुरू झाला. पंधरा ते वीस विवाह लॉकडाउन काळात अत्यल्प खर्चात पार पडल्याने वधू वर यांच्या कुटूंबियांचा लाखो रूपयांची बचत या निमित्ताने झाल्याने कायमस्वरूपी अशाच पद्धतीने डामडौल न करता विवाह असावेत अशी भावना आळंदीच्या पूर्व पट्ट्यातील शेतकरी बांधवांची आहे.

कार्यालयाचे भाडे आणि जेवणावळीवर केला जाणारा लाखो रूपयांचा खर्च वाचला. फटाके आणि वाजंत्रीं, बॅण्डचा अनावश्यक खर्चही वाचला. मोठ्या लग्नातून आता अन्न वाया जाणार नाही. शेतकरी आणि गोरगरिबांच्या पैशांची अशा पद्धतीच्या लग्नामुळे मोठी बचत झाली. धानोरे गावात अशाच पद्धतीने थाटमाट न करता साधा विवाह झाल् असे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गावडे यांनी सांगितले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

दुध व्यावसायिक आणि छोट्या शेतक-यांना मंगल कार्यालयाची भाडे आणि डौमडौलसाठीचा खर्च परवडत नाही. ध्वनी प्रदूषण आणि वाहतुक कोडीचा प्रश्न निकाली निघाला. मरकळ सारख्या सधन गावातही साधेपणाने विवाह लागल्याने आमच्या परिसरासाठी आदर्श पुढे आल्याने यापुढे अशा विवाहाची परंपरा चालू राहिल असे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

Titwala Train Accident : भयंकर दुर्घटना! ट्रेनच्या इंजिनमध्ये मृतदेहाचे तुकडे; मृत व्यक्तीचे अवयव बाहेर काढण्यासाठी कापला कॅटल गार्ड, लोकल सेवा खोळंबली

Obscene Video Case: अश्‍लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी तिघांवर गुन्हा: पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अशोक खरात व्हिडिओचे प्रकरण भाेवल!

'येडे चाळे केले म्हणूनच इथपर्यंत पोहचलो' सुरज चव्हाणला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'ज्याला भोळा समजत होतो, त्याने....'

Supreme Court: मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टाने रद्द केला उच्च न्यायालयाचा निकाल, अचानक उलटला खेळ… सगळेच झाले थक्क!

SCROLL FOR NEXT