corona and tourists update  sakal
पुणे

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सिंहगड पर्यटकांना बंद, वन विभागाची माहिती

कोरोनाचा संसर्ग पुन्हा अचानक वाढल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : कोरोनाचा संसर्ग पुन्हा अचानक वाढल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध केले आहेत. पर्यटन ठिकाणी गर्दी होत असल्याने पर्यटन स्थळ, गड किल्ले पर्यटकांसाठी बंदी घातलं आहे. त्या धोरणानुसार सिंहगड देखील पर्यटकांच्यासाठी बंद केल्याची माहिती वन विभागाने दिली.(corona and tourists update)

शहर व जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारने काही पावले उचलली आहेत. नागरीक, पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही निबंध सुद्धा लादले आहेत. शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे.

शहराजवळ असलेल्या सिंहगड व खडकवासला पानशेत व वरसगावच्या परिसरात दररोज हजारो पर्यटक येतात. सुट्टीचे दिवशी तर पर्यटकांची संख्या जवळपास पंधरा- वीस हजार एवढी असते. वनविभागाने राज्य सरकारच्या भूमिकेनुसार बंदी घातली आहे. असे भांबुर्डा चे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले.

सिंहगडावर आतकरवाडीतून पायवाटेने व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांनी जमावबंदीच्या नियमांचे पालन करावे. यात एकावेळी पाच पेक्षा जास्त जणांनी एकत्र जाऊ नये. असे आवाहन ही संकपाळ यांनी केलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT