Police arrested टिम ई सकाळ
पुणे

चौकशीसाठी बोलाविल्यानंतर पोलिस चौकीत गोंधळ घालणाऱ्या दोघांना अटक

सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याअंतर्गतच्या वडगाव पोलिस चौकीत शुक्रवारी सकाळी अकरा वाजता घडला प्रकार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावल्यानंतर चौकीत गोंधळ घालून जबाबाची कागदपत्रे फाडणाऱ्या दोघांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. हि घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याअंतर्गतच्या वडगाव पोलिस चौकीत घडला. (Pune Crime News)

रवींद्र शांताराम उन्हाळे (वय 37), रामदास शांताराम उन्हाळे (वय 38, दोघे रा. मित्र मंडळ चौक, वडगाव धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एका महिलेविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेजा जानकर यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी "पॉक्‍सो' अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

संबंधित गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. त्यानुसार, पोलिसांनी उन्हाळे कुटुंबीयांना शुक्रवारी सकाळी वडगाव पोलिस चौकीत चौकशीसाठी बोलाविले होते. दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्याकडून त्यांची चौकशी सुरु होती. त्यावेळी उन्हाळे व त्यांच्यासमवेत असलेल्या महिलेने पोलिस चौकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

जबाबाची कागदपत्रे फाडून टाकली. तसेच पोलिसांना जातीवाचक शिवीगाळ करुन आंदोलन करण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतिभा तांदळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT