Water Supply esakal
पुणे

Water Supply : सिंहगड रस्ता, धनकवडी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

पुणे महापालिकेने गुरुवारी (ता. १३) वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत असणार्या भागात पाणी बंद ठेवला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेने गुरुवारी (ता. १३) वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत असणार्या भागात पाणी बंद ठेवला. शुक्रवारी (ता. १४) पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षित असताना रात्री उशिरापर्यंत सिंहगड रस्ता, धनकवडी, पद्मावती या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही.

तांत्रिक अडचणीसह विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे पाणीपुरवठा झाला आहे. शनिवारी (ता. १५) जास्त वेळ पाणी दिले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी हाती घेण्यात आले होते, त्यामुळे त्या अंतर्गत येणार्या भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले होते. मात्र हिंगणे, आनंदनगर, सन सिटी, धायरी, वडगाव, पद्मावती, तळजाई, धनकवडी यासह इतर भागात दुपारी १२ वाजून गेले तरी पाणी आलेले नव्हते. त्याबाबत महापालिकडे तक्रारी गेल्यानंतर दुपारी दोन-तीन च्या सुमारास पाणीपुरवठा सुरू होईल असे सांगण्यात आले होते. पण पाणी आले नसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले",वडगाव जलशुद्धीकरण केंद्राचे दुरुस्तीच्या कामात गुंतागुंती निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी दुपारी बारा वाजता काम पूर्ण झाले. त्यानंतर पंपिंग सुरू केल्यानंतर दुसऱ्या मोटारी मध्ये बिघाड झाल्याने पुन्हा दुरुस्तीची काम हाती घ्यावे लागले. त्यानंतरही काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.

या अडचणी दूर झाल्यानंतर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने महावितरण तर्फे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागात रात्री उशिरा नंतर पाणीपुरवठा सुरू होईल. नागरिकांचे झालेली गैरसोय लक्षात घेऊन शनिवारी जास्तीत जास्त पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : भाषेची सक्ती केल्यास आम्ही शक्ती दाखवू - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT