corona test.jpg 
पुणे

पुण्यात आतापर्यंत साडेसहा लाख चाचण्या; २५०५ नवे कोरोना रुग्ण

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात (ता.२५) २ हजार ५०५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या (सोमवार) तुलनेत (मंगळवारी) रुग्णांची संख्या वाढली आहे. आजच्या एकूण रुग्णांमध्ये  पुणे शहरातील १ हजार २०४ जण आहेत. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात २ हजार ७३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील ८५७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३४५, नगरपालिका क्षेत्रातील ६६ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील ३३ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत ९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या एकूण मृत्यूपैकी पुणे शहरातील सर्वाधिक ४४ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ३१, जिल्हा परिषद क्षेत्रातील १६, नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. २४) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. २५) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे जिल्ह्यातील कालअखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ४९  हजार ८९७, कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख १५ हजार ३७८ तर  रुग्णांच्या मृत्यूची संख्या ३ हजार ७४२ झाली आहे. मृत्यू  झालेल्यांमध्ये  पुणे जिल्ह्याबाहेरील ९७ रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत साडेसहा लाख चाचण्या 

दरम्यान, कोरोनाचे अचूक निदान करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील एकूण सहा लाख ५७ हजार ५८३ व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये  सर्वाधिक चार लाख १४ हजार २९४ चाचण्या फक्त पुणे शहरातील व्यक्तींच्या घेण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये १ लाख ६० हजार ९८६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५० हजार २१२, नगरपालिका क्षेत्रात २० हजार ५५१ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ११ हजार ५४० चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT