पुणे

'ते' एकाच गावात राहणारे सहा तरूण करायचे लुटमार

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दानापूर-पुणे एक्सप्रेस मध्ये लुटमार करणाऱ्या एका टोळीची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दल व दौंड लोहमार्ग पोलिसांनी पकडलेल्या या टोळीतील सहा तरूण जळगाव जिल्ह्यातील एकाच गावाचे रहिवासी आहेत.

दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज कलकुटगे यांनी या बाबत माहिती दिली. प्रशांत राजू पाटील, अभिषेक सोपान पाटील, किरण प्रकाश पाटील, रवींद्र शिवाजी पाटील, योगेश सुभाष पाटील व शुभम भाईदास पाटील (सर्व रा. रोकडे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) या सहा जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांचे वय २० ते २३ दरम्यान असून ते बेरोजगार आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, ७ मार्च रोजी नगर रेल्वे स्थानक सोडल्यानंतर टोळीने एक्सप्रेस मधील सर्वसाधारण डब्ब्यातील प्रवाशांना मारहाण करीत त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेतले. सदर प्रकार सुरू असताना एक्सप्रेस मधील रेल्वे सुरक्षा दलाचे कॅान्स्टेबल यांना माहिती मिळताच त्यांनी टोळीला रोखले. सर्वसाधारण डब्बा सील करण्यासह वरिष्ठांना कळविल्यानंतर सदर टोळीला सोनवडी (ता. दौंड) कॅार्ड लाइन स्थानकावर उतरावून दौंड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

सदर प्रकरणात मनिषकुमार मंडल (रा. बरूआरी, जि. सुपौल, बिहार) या प्रवाशासह एकूण पाच प्रवाशांनी त्यांच्याकडील एकूण ८ हजार ११० रूपये लुटल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहमार्ग न्यायालयाच्या आदेशानुसार टोळीतील सहा जणांची १३ मार्च रोजी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

America Car Culture : अमेरिकेत मर्सिडीज-बीएमडब्ल्यू पाहून श्रीमंत समजू नका! भारतीय तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव, पाहा VIRAL VIDEO

Dusseldorf Ganeshotsav : ड्युसेलडॉर्फमध्ये गणरायाची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात रंगला मराठमोळा उत्सव

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

SCROLL FOR NEXT