corona
corona 
पुणे

शिरूरमध्ये कोरोनाचा गुणाकार, चार दिवसांत साठ रुग्ण

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) : लाॅकडाउनच्या शिथिलतेमुळे गजबजलेले औद्योगीकरण, नाकेबंदी उठल्यामुळे रस्त्यावर वाढलेली वर्दळ, बाजारपेठेतील वाढती गर्दी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कमी झालेले गांभीर्य व शासकीय नियमांना हरताळ फासण्याच्या वाढलेल्या प्रवृत्तीमुळे शिरूर तालुक्यात कोरोनाचा गुणाकार सुरू झाला असून, गेल्या चार दिवसात तब्बल साठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर तालुक्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येने सव्वाशेचा टप्पा गाठला. 

शिरूर तालुक्यात 23 मार्च रोजी पहिला रुग्ण सणसवाडी येथे सापडला. त्यानंतर शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भीमा या भागात रुग्ण वाढले होते. महिनाभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दहावर पोचली होती. त्यानंतरच्या महिनाभरात पुन्हा दहा रुग्ण वाढले. मात्र, त्यानंतर रूग्णसंख्येवर लक्षणीय मर्यादा आली होती. एक जुलैपर्यंत पन्नास; तर त्यानंतरच्या पाच दिवसात ही संख्या 64 वर पोचली. नव्याने रूग्णसंख्येपेक्षा बाधिताच्या संपर्कात आलेल्याचे प्रमाण त्यानंतर झपाट्याने वाढले असून, गेल्या चार दिवसात तब्बल साठजण बाधित झाले आहेत. 

कोरोनाचे आक्रमण सुरू झाल्यानंतरही तब्बल अडीच महिन्यांहून अधिक काळ हे संकट रोखून धरणा-या शिरूर शहरात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आता बाहेरील कनेक्शन संपून स्थानिकांवर कोरोनाचा हल्ला होऊ लागल्याने शहरवासियात घबराट पसरली आहे. मंगळवारपर्यंत सात रुग्ण संख्या असलेल्या शहरात गेल्या दोन दिवसात तेवढेच रुग्ण वाढले आहेत. काल कोरेगाव भीमा येथील एकाच कुटुंबातील पाच जण बाधित झाल्यानंतर आज निमगाव म्हाळुंगी येथील एकाच कुटुंबातील तब्बल दहा जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले. दोन महिने कोरोनाला रोखून धरणा-या रांजणगाव गणपतीमध्ये काल तीन; तर आज एक पाॅझिटिव्ह आला. सणसवाडीत काल दोघांना व आज चौघांना कोरोनाची बाधा झाली. पाबळला काल आणि आज प्रत्येकी एक रुग्ण सापडला. शिक्रापूर या दाट लोकवस्तीच्या गावात आज एका दिवसात सात बाधित रुग्ण आढळले. पिंपळे धुमाळ व केंदूर येथे काल; तर कासारी, वढू बुद्रुक व तळेगाव ढमढेरेत आज प्रत्येकी एक रुग्ण सापडला.    

शिरूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आजअखेर 124 झाली असून, आतापर्यंत चाळीस जण बरे झाले आहेत. पाच व्यक्तींचा मृत्यू झाला असून, 15 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सुरवातीला पुणे- मुंबई कनेक्शन बाधक ठरले. त्यानंतर एमआयडीसी व इतर औद्योगिकरणातील पुणे, पिंपरी चिंचवड येथून कामाला येणारांमुळे मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला. पण, सद्यस्थितीत ही विशिष्ट कारणे दिसत नसून, आता शासकीय कर्मचारी, स्थानिक नागरिक, आडतदार, शेतकरी व गृहिणी महिलांपर्यंत कोरोनाची बाधा पोचली आहे. त्यामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन प्रत्येकाने कठोरपणे करणे गरजेचे आहे. 

रुग्ण वाढीच्या या वेगाचे प्रत्येकाने गांभीर्य पाळावेत. विनाकारण घराबाहेर पडून संसर्गाला बळी पडू नये. आवश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्कशिवाय बाहेर पडू नये.
 - डाॅ. आर. डी. शिंदे
तालुका आरोग्य अधिकारी, शिरूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT