Panchanama
Panchanama Sakal
पुणे

‘आई’ दिनानिमित्त नवऱ्याचे ‘सॅंडविच’

सु. ल. खुटवड

‘दररोज तू तुझ्या आईबरोबर मोबाईलवर तास- दीड तास बोलतेस. तेच तेच बोलायला तुला कंटाळा कसा येत नाही गं? कधीतरी माझ्या आईशी एक- दोन मिनिटे बोलत जा की.’ सौरभने हातवारे करीत म्हटल्याने स्नेहाच्या रागाचा पारा वर चढला.

‘मी माझ्या आईशीच बोलते ना. तुमच्यासारखे रोज वेगवेगळ्या मैत्रिणींशी रात्रभर चॅटिंग तर करत बसत नाही ना? ‘जे वन’ झाले का? हा प्रश्‍न दररोज विचारून, तुम्हाला कंटाळा येत नाही का? आणि तुमच्या आईशी बोलून टोमणे ऐकून घेण्यापेक्षा न बोललेलेच बरे.’’ स्नेहानेही आवाज चढवला.

‘माझी आई टोमणे मारते आणि तुझी आई माझी काय आरती ओवाळते का? दीड तासांपैकी अर्धा तास तर माझी आणि माझ्या आईची बदनामीच चाललेली असते?’’ सौरभने असे म्हटल्यावर स्नेहानेही पलटवार केला. ‘‘म्हणजे तुम्ही आमचे बोलणे चोरून ऐकता तर’’?

‘चोरून कशाला ऐकायला पाहिजे. आगीचा बंब ठणाणा करत गेल्यासारखा तर तुमच्या दोघींचा आवाज आहे. कानात कापसाचे बोळे घातले तरी स्पष्ट ऐकू येतं.’’ सौरभने म्हटलं.

‘बाई गं ! तुम्ही आॅफिसला जात होता, तेव्हा बरं होतं. एकदा डबा दिला की दिवसभर कटकट नसायची. कडक निर्बंध लागू झाल्यापासून दर अर्ध्या तासाने ‘हे खायला दे.. ते खायला दे..’ असं सारखं चालू झालंय. एका महिन्यांत तुमचा आकार डबल झालाय आणि मी मात्र नवनवीन पदार्थ करून आणि भांडी घासून घासून उसाचे चिप्पाड झालेय. त्यात माझ्या आईशी बोललं तरी तुमच्या पोटात दुखतं.’’ असं म्हणून स्नेहाने भांड्याची आदळआपट केली.

‘माझं खाणं काढू नकोस. तू माझा नाश्‍ता व स्वयंपाक केला नाही तरी मी उपाशी मरत नाही. माझ्या आईने मला थोडा- फार स्वयंपाक करायला शिकवलं आहे. त्यावर मी भागवून घेईन.’’ सौरभने म्हटले.

‘तोंड बघू स्वयंपाक करणाऱ्याचे. साधा चहा तरी करता येतो का?’’ स्नेहाने डिवचले.

‘तू आतापासून माझ्यासाठीही काहीही बनवायचं नाही. माझं मी करेन. नाहीतर उपाशी झोपेन.’’ सौरभही हट्टाला पेटला. त्यानंतर स्नेहाने गॅस बंद केला आणि बेडरूममध्ये जाऊन आईशी मोबाईलवर गप्पा मारायला लागली. भांडून- भांडून सौरभलाही भूक लागली होती. त्याने फ्रिजमधून ब्रेड काढला व सॅंडविच करायला सुरवात केली. टोमॅटो आडवी- तिडवी कापली, काकडीच्या चकत्या काय धड झाल्या नाहीत. गॅसशेजारी ठेवलेल्या भांड्यातून त्याने हिरवी चटणी घेतली. सॅंडविचला बटर लावलं तर आणखी छान लागतं, अशी स्नेहा सारखी म्हणायची म्हणून त्याने डब्यातून छोट्या बटरांचा पुडा काढला. ‘हे बटर तर चहात बुडवून खायला चांगलं लागतं. सॅंडविचमध्ये घातल्यावर चव कशी वाढते’, हे त्याला कळेना पण काहीतरी त्यात तथ्य असेल असं त्याला वाटल्याने त्याने बटरांचा चुरा केला व सॅंडविचमध्ये तो टाकला. एवढं सारं त्या सॅंडविचमध्ये काही बसेना. मग त्याने आणखी हिरवी चटणी टाकून, ते सगळं एकजीव केलं व गॅसवर ठेवून ते भाजलं व एका ताटात सॅंडविच घेऊन तो हॉलमध्ये आला.

‘मी कोणावर अवलंबून नाही. आम्हालाही स्वयंपाक करता येतो. कोणी स्वयंपाक केला नाही तर उपाशी राहणार नाही,’’ असं स्नेहाला ऐकू जाईल, एवढ्या मोठ्या आवाजात सौरभ बोलू लागला. पण आजची सॅंडविचची चव काही वेगळीच लागत होती पण भुकेच्या तडाक्यामुळे त्याने त्यावर ताव मारला. अर्ध्या तासाने स्नेहा किचनमध्ये आली.

‘मी गॅसशेजारी ठेवलेल्या मेंदीचे मिश्रण कुठं गेलं.’’ असं म्हणत तिने आरडा- ओरड केला. त्याचवेळी चटणी म्हणून आपण सॅंडविचला काय लावलं, या विचारानं सौरभ हैराण झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT