Petrol
Petrol 
पुणे

पेट्रोलचा भडका; भाऊंचा तडका!

सु. ल. खुटवड

पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर पोचल्याने जनुभाऊ फारच चिडचिड करू लागले. ‘आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी गाड्या विकून, चालत प्रवास करावा, अशी सरकारची इच्छा आहे काय? असे सोसायटीत भेटेल त्याला ते ऐकवू लागले. चेअरमन कारंडे यांनाही त्यांनी हे वाक्य ऐकवले. त्यावर कारंडे यांनी ‘पण याचा अर्थ दुसऱ्यांच्या गाडीतील पेट्रोल चोरण्याचा आपल्याला परवाना मिळाला, असा होत नाही’ असा पलटवार केला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावर जनुभाऊ एकदम चिडले. ‘माझ्या गाडीतील पेट्रोल अचानक संपल्याने एखाद्याच्या गाडीतील वाटीभर पेट्रोल काढून घेतले तर बिघडले कोठे? तुमच्यासारखे ऑफिसमधील स्टेशनरी तर आम्ही चोरून घरी आणत नाही ना? ’’ जनुभाऊंच्या या वाक्याने कारंडे डिवचले. दोघांत चांगलीच जुंपली. थोड्याच वेळात नेहमीप्रमाणे सोसायटीतील सभासदांनी भांडण ऐकण्यासाठी गर्दी केली. गर्दी पाहून जनुभाऊंना एकदम जोर चढला. त्यांनी मागचे सगळे उट्टे काढले. अर्धा तास भांडल्यानंतर त्यांना एकदम तरतरी आली व पेट्रोल भरण्यासाठी ते पंपाकडे गेले. तिथे पोचल्यावर त्यांनी गाडीतील सारे पेट्रोल एका बाटलीत काढून घेतले. 

‘दोनशे चौदा रुपयांचे पेट्रोल टाका.’ तेथील कर्मचाऱ्याला त्यांनी सांगितले.
‘आजोबा, एकतर दोनशे दहा रुपयांचे टाका नाहीतर दोनशे वीस रुपयांचे टाका.’ कर्मचाऱ्याने सुचवले.
‘हे तुम्ही मला कोण सांगणार? तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पेट्रोल टाकायचे का? तुम्ही राउंड फिगरचे आकडे आधीच सेट करून, कमी पेट्रोल देता, हे आम्हाला माहिती आहे. व्हॉट्सॲपवरील व्हिडिओत आम्ही ते अनेकदा पाहिलंय. आधी मला झिरो दाखवा. त्यानंतरच पेट्रोल भरा. मात्र, त्यावेळी माझ्याशी एकही शब्द बोलू नका. ग्राहकांना बोलण्यात गुंतवून तुम्ही कमी पेट्रोल देता, अशी अनेकांची तक्रार आहे.’’

त्यावर कर्मचाऱ्याने जनुभाऊंशी बोलणेच टाळले. दोनशे चौदा रूपयांचे पेट्रोल भरले. त्यानंतर राहिलेले तीन-चार थेंब टाकीत पडण्यासाठी जनुभाऊंनी नळकांडे हलवायला सांगितले.
‘महागाईच्या काळात एक-एक थेंब महत्वाचा आहे,’ असे म्हणून जनुभाऊंनी त्याला पाचशेची नोट दिली. 
‘आजोबा, सुटे पैसे द्या.’’ 
‘एवढ्या मोठ्या पेट्रोलपंपाकडे पाचशे रुपये सुटे नाहीत? याचा अर्थ तुमचा धंदा व्यवस्थित चालत नाही, असा होतो. तुम्ही भेसळ वगैरे करत असल्यानेच असे होत असणार.’ जनुभाऊंनी त्याला धारेवर धरले. तो कर्मचारीही जनुभाऊंच्या वागण्याने वैतागून गेला होता.
‘अहो तसं काही नाही. तुमच्याकडे असतील तर बरं होईल, एवढंच मला म्हणायचंय.’

त्यावर जनुभाऊंनी त्याला चांगलंच फैलावर घेतलं. त्यानंतर त्यांनी गाडी बाजूला घेतली. गाडीतील सर्व पेट्रोल एका प्लॅस्टिकच्या डब्यात भरलं. त्यानंतर पिशवीतून कॅल्क्युटर काढून, आकडेमोड करत बसले. त्यानंतर डब्यावरील आकड्यांकडे बघितले. दहा मिलिमीटर पेट्रोल कमी असल्याचे त्यांना जाणवले. 
‘हे बघा, गाडीतील पेट्रोल मी आधीच काढले होते. टाकी रिकामी होती. मात्र, तुम्ही मला दहा मिलिलिटर पेट्रोल कमी दिले आहे. वाटल्यास कॅल्क्युटरवर तुम्ही हिशेब करा. माझ्या कष्टाचे दहा मिलिमीटर पेट्रोल ढापून तुम्हाला काय मिळणार आहे? मी एवढी काळजी घेऊनही तुम्ही मला चुना लावताय? हे बरोबर नाही.’ त्यावर कर्मचाऱ्याने डोक्याला हात लावला व परत टाकीत थोडे पेट्रोल टाकले आणि मग विजयी मुद्रेने जनुभाऊ तेथून बाहेर पडले. 
‘आजोबा, फारच काटेकोर आहेत बुवा. दहा मिलिमीटर पेट्रोल कमी दिले म्हणून भांड भांडले आणि पाचशे रूपयांतील उर्वरित २८६ रूपये घेण्याचेच विसरले,’ असे म्हणत एका कर्मचाऱ्याने दुसऱ्याला टाळी दिली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : भाजपचा रायबरेलीतून उमेदवार ठरला; या नेत्याला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT