पुणे

स्मार्ट सिटी, शांततेचे शहर बनवू या

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘‘हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण वाढवू नका, आपल्याला आपले शहर स्मार्ट सिटी, शांततेचे शहर (सायलेन्ट सिटी) बनवायचे आहे,’’ असे भावनिक आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी केले. निमित्त होते, आरटीओ, पोलिस आयुक्तालय, रोटरी क्‍लब आणि बसचालक असोसिएशनतर्फे ‘नो हॉर्न’ दिनानिमित्त आयोजित जनजागृती मोहिमेचे.

शहराला ध्वनी प्रदूषणातून विशेषतः हॉर्नच्या कर्कश आवाजातून मुक्त करण्यासाठी ‘नो हॉर्न’ उपक्रम शहरात राबविण्यात आला. त्याचे औपचारिक उद्‌घाटन निगडीतील टिळक चौकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या हस्ते झाले. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर, मोटार वाहन निरीक्षक उदय इंगळे, पोलिस निरीक्षक एन. के. घोगरे, रोटरी क्‍लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी आदी उपस्थित होते.

तळवडेतील त्रिवेणी चौक, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, निगडी- प्राधिकरणातील संभाजी चौक, रावेत येथील बास्केट पूल, नाशिक फाटा, टाटा मोटर्स कंपनीचे मेनगेट या ठिकाणी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. रोट्रॅक्‍ट क्‍लब ऑफ डी. वाय. पाटील, राजा शिवछत्रपती शिवाजी विद्यालय तळवडे यांचे सहकार्य लाभले. प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांनी पोस्टर, स्टिकर आणि वाहनचालकांशी संवाद साधून हॉर्न न वाजविण्याचे आवाहन केले. 

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील म्हणाले, ‘‘हॉर्न वाजविणे वाजविणारा व ऐकणाऱ्यांनाही धोकादायक आहे. त्यामुळे हृदयविकार, मानसिक तणाव, नैराश्‍य अशा प्रकारचे गंभीर आजार होत आहेत. अचानक वाजलेल्या हॉर्नमुळे अपघात होऊ शकतो. अतिआवश्‍यक असेल तरच हॉर्न वाजवावा. शहराला हॉर्नमुक्त करण्यासाठी वाहतूक विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांना नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे.’’

विद्यार्थ्यांचा संकल्प
पिंपरी-चिंचवड शहर माझे शहर आहे. माझ्या शहराच्या पर्यावरणाचे संवर्धन करणे माझे कर्तव्य आहे. हॉर्नमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची मानवी जीवनावर होणाऱ्या गंभीर परिणामांची मला जाण आहे. माझ्या पालकांनी हॉर्नचा आवाज करू नये, या साठी मी प्रयत्नशील राहील, अशी शपथ प्रादेशिक परिवहन विभागातर्फे शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT