Tik-Tok 
पुणे

Video : 'टिकटॉक'मधून सापही सुटले नाहीत; 'लाईक्स'साठी सापांचा छळ

सागर आव्हाड

पुणे : ‘टिकटॉक’ या सोशल साइटवर स्वतःचा बोलबाला करून घेण्यासाठी स्वयंघोषित सर्पमित्रांनी सापांचा आधार घेतला आहे. केवळ ‘लाइक’च्या खेळासाठी हे लोक सापांबरोबरच स्वतःच्याही जिवाशी खेळत आहेत. या खेळाला आवर घालण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले असून, गेल्या आठवड्यात तिघांवर कारवाई केली आहे. 

साप पकडण्याचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण नसतानाही हे टिकटॉकबहाद्दर जंगल, शेतांमध्ये जाऊन साप पकडतात. या सापांशी वेडेवाकडे खेळ करून त्याचा ते व्हिडिओ बनवितात. नंतर तो टिकटॉकवर अपलोड करतात. या व्हिडिओंना मिळणाऱ्या ‘लाइक्‍स’च त्यांच्यासाठी सर्व काही असते. अर्थात हा ‘उद्योग’ करताना त्यांच्याकडून सापांचा जो छळ होतो, तो अमर्यादितच! यात अनेकदा साप मरतातसुद्धा. कधी कधी या स्वयंघोषित सर्पमित्रांनाही सर्पदंशाला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, अलीकडे वाढलेले हे प्रकार वनविभागाने गांभीर्याने घेतले आहेत. टिकटॉकवर अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओंच्या आधारे वनविभाग संबंधितांपर्यंत पोचून त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. गेल्या आठवड्यात अशा प्रकारे विभागाने तिघांवर कारवाई केली आहे. यापुढे कारवाई आणखी कडक करण्यात येणार आहे, असे भांबुर्डा विभागाचे वनाधिकारी दीपक पवार यांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यात सुमारे तेराशे सर्पमित्र अधिकृत आहेत. वनविभागाने त्यांना ओळखपत्रही दिले आहे. तथापि, खऱ्याखुऱ्या सर्पमित्रांपेक्षा स्वयंघोषित सर्पमित्रांचा सध्या सुळसुळाट वाढला आहे. केवळ ‘चमकोगिरी’साठी ते स्वतःला सर्पमित्र म्हणवून घेताहेत. साप कसा पकडायचा हे यू-ट्यूबवर पाहून शिकायचे आणि त्या पद्धतीने साप पकडण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. प्रत्यक्षात सापांविषयी कसलेही शास्त्रीय ज्ञान नसताना हा केला जाणारा जीवघेणा प्रयत्न अनेकदा त्यांच्या जिवावर बेततो, असे सर्पमित्र दिनेश पवार व नीलकंठ मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

Nagpur Crime: डिजिटल अरेस्टचा आठ दिवसांचा सापळा! नागपुरातील ७५ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला २९ लाखांचा गंडा

माझ्यासाठी थांबू नकोस, मी आता... सचिन यांनी सांगितली लक्ष्मीकांत यांची 'नवरा माझा नवसाचा' दरम्यानची आठवण

समोर गोड बोलतात, पण मनात काही वेगळंच? चाणक्य नीती सांगते व्यक्ती ओळखण्याचे संकेत

Latest Marathi News Live Update : देऊळगाव रसाळमध्ये विहिरीच्या खोदकामावेळी दुर्घटना; दडी कोसळून दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT