PCMC 
पुणे

...तर जीव वाचला असता

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - झाडाच्या धोकादायक फांद्या हटविण्याबाबत स्थानिकांनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तब्बल तीन वेळा पत्रव्यवहार केला. त्याची वेळीच दखल घेतली असती, तर रमेश कारंडे यांचा जीव वाचला असता. विशेष म्हणजे या दुर्घटनेनंतरही काही झाडांच्या फांद्या धोकादायक स्थितीत आहेत. 

चिखलीतील कृष्णानगरहून थरमॅक्‍स चौकाकडे येणाऱ्या मार्गावरील कस्तुरी मार्केटसमोर धोकादायक झाड आहे. सोमवारी (ता. ९) दुपारी रमेश कारंडे या दुचाकीस्वारांच्या अंगावर फांदी पडून ते गंभीर जखमी झाले. गुरुवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या झाडाच्या धोकादायक फांद्या हटविण्याबाबत स्थानिक नागरिक सूरज पारखे, सुभद्रा पारखे यांनी दोनवेळा अर्ज दिला होता. यासह सरोजिनी पोटे, शशिकांत जगताप, सुमीत रांका यांनीही निवेदने दिली होती. तसेच अनेकदा तोंडीही सांगितले होते. तरीही त्याकडे दुर्लक्ष करीत फांद्या हटविल्या नाहीत.

तब्बल सहा महिने उलटूनही अर्जाची दखल घेतली गेली नाही. अखेर नऊ डिसेंबरला दुर्घटना घडली. तरीही उद्यान विभाग अद्याप ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी सायंकाळी दुकानासमोर झाडून घेत असताना वाळलेली फांदी पडून गोपाल सिंग (वय २६) हा किरकोळ जखमी झाला होता. 

अर्जदार सूरज पारखे म्हणाले, ‘झाडाच्या अनेक फांद्यांना वाळवी लागली आहे. त्या कधीही कोसळतात. जीव मुठीत धरून येथून ये-जा करावी लागते. वारंवार अर्ज करूनही दखल घेतली जात नाही. उद्यान विभाग आणखी किती जणांचा बळी जाण्याची वाट पाहणार आहे.’’ 

दरम्यान, वारंवार पत्रव्यवहार करूनही झोपी गेलेल्या उद्यान विभागाला थेट दुर्घटना घडल्यानंतरच जाग आली. दुर्घटनेनंतर मंगळवारी उद्यान विभागाचे कर्मचारी अखेर धोकादायक झाडाकडे फिरकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT