आळंदी (पुणे) : भाजी विक्रेत्यांची बैठक पोलिस ठाण्यात घेतली. मात्र, यावेळी भाजी विक्रेत्यांच्या गर्दीमुळे पोलिस ठाण्याच्या आवारातच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाले. आता कारवाई कोणावर, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला.
पुण्यात पोलिसांनाच कोरोनाची लागण झाल्याचे चित्र आहे. आळंदीलगत चऱ्होली बुद्रुकमध्ये एका पोलिसाला कोरोना झाला. मात्र, तरीही आळंदी पोलिस आणि पालिका प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आळंदी पोलिस ठाण्यात भाजी विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी समीर भूमकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर आणि काही नगरसेवकांची उपस्थीती होती. यावेळी पोलिस ठाण्याच्या आतील बाजूस झालेल्या बैठकीत प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचना ऐकण्यासाठी विक्रेत्यांची गर्दी होती. पोलिस ठाण्याच्या संरक्षक भिंतीबाहेरही कोणतेही सुरक्षित अंतर न ठेवता लोक उभे होते.
बैठकीत झाले हे निर्णय...
रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी देहूफाटा येथे नवीन एसटी स्थानकाच्या जागेत आणि ठिकठिकाणी मोकळ्या रस्त्यांवर भाजी विक्रेते बसवले जाणार आहे. सोसायट्यांच्या आवारातही भाजी विक्रेते बसवले जाणार आहेत. लॉकडानच्या काळात उत्पन्नाचा केवळ एकमेव मार्ग शिल्लक असल्याने अनेकांनी पर्याय म्हणून भाजी विक्रीस सुरुवात केली. याचा परिणाम विक्रेत्यांची संख्या वाढली. माणुसकीच्या भावनेतून कारवाई करता येत नसल्याने आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी लांब लांब विक्रेते बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.