Dr Baba Adhav Sakal
पुणे

Dr. Baba Adhav : समाजवाद्यांनी ‘इंडिया’च्या मागे ताकद उभी करावी

देशात सध्या लोकशाही धोक्यात आहे. यामुळे शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील वंचित घटकांचे प्रश्‍न गंभीर होत चालले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - देशात सध्या लोकशाही धोक्यात आहे. यामुळे शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील वंचित घटकांचे प्रश्‍न गंभीर होत चालले आहेत. मात्र केंद्र सरकारला या प्रश्‍नांचे काही देणे-घेणे नसून उलट सरकारच्या संवेदना बोथट होत चालल्या असल्याचे मत ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी (ता.२४) पुण्यात एका जाहीर बैठकीत बोलताना व्यक्त केले.

त्यामुळे लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी देशातील सर्व समाजवाद्यांनी, याबाबत जनतेशी संवाद साधला पाहिजे. शिवाय धर्मनिरपेक्ष विचारातून स्थापन झालेल्या इंडिया आघाडीच्या मागे मोठी ताकद उभी करावी, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

संयुक्त जनता दल या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार कपिल पाटील यांच्या पुढाकाराने आज पुण्यात समाजवादी जनता परिवाराच्या एकजुटीच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात प्रदीर्घ काळ ही बैठक झाली.

या बैठकीला डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षी, प्रा. सुभाष वारे, नितीन वैद्य, अभिजित वैद्य, शशांक राव, शान-ए-हिंद, शब्बीर अन्सारी आदी विविध राजकीय पक्ष व कष्टकरी, कामगार व विद्यार्थी संघटनांचे राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. आढाव पुढे म्हणाले, ‘तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सन १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू केली होती. या आणीबाणीपासून देशाला वाचविण्यासाठी जनता दल हा पक्ष निर्माण झाला. आताही देशात अघोषित आणीबाणीच सुरू आहे. यामुळे लोकशाही व राज्यघटना धोक्यात आली आहे. त्यामुळे आता लोकशाही व राज्यघटना वाचविण्याची गरज आहे.’

विषमता, धार्मिक तेढ, बेरोजगारीत वाढ - सुराणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने भांडवली धोरणांना प्राधान्य दिल्याने, या धोरणांमुळे देशात विषमता, धार्मिक तेढ आणि बेरोजगारीत मोठी वाढ होऊ लागली आहे. यातून देशाचे तुकडे पडण्याचा धोका वाढला आहे.

दिवसेंदिवस आपला रोख सांप्रदायिकतेकडे चालला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारच्या या धोरणांच्या विरोधात सर्व समाजवाद्यांनी उभे राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT