tushar bhor
tushar bhor 
पुणे

...पण जीवनाच्या लढाईत तो हरला

डी. के. वळसे पाटील

भोर कुटुंबांची अवस्था; मुलगा झालेल्या तुषारची जीवनाच्या लढाईत हार

मंचर (पुणे) : घरात नवा पाहुणा येणार म्हणून सर्वजण खूष होते; मात्र भावी पिता अचानक आजारी पडला आणि सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. तो काविळीशी लढ देत असताना त्याला पुत्रप्राप्ती झाली; पण जीवनाच्या लढाईत तो हरला होता. त्यामुळे एकीकडे घरात आलेल्या नव्या पाहुण्याचा आनंद, तर दुसरीकडे घरातील कर्ता गमाविण्याचा दुर्दैवी प्रसंग भोर कुटुंबाच्या वाट्याला आला.

आंबेगाव तालुक्‍यातील वळतीच्या गांजवेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली. सेवानिवृत्त कृषी अधिकारी ज्ञानेश्वर ऊर्फ डी. के. भोर यांचा तुषार (वय 31) हा थोरला मुलगा. तुषार याने संगणक अभियंता पदाचे शिक्षण घेतलेले असून तो पुण्यातील एका कंपनीत नोकरीला होता. वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील पांडुरंग वाळूंज यांची कन्या अंकिता हिच्याबरोबर दोन वर्षांपूर्वी तुषार याचा विवाह झाला होता. अंकिताही संगणक अभियंता असून तीही नोकरी करते. दोघांच्या सुखी संसाराचा गाडा आनंदात सुरू होता.

दरम्यान, अंकिताला प्रसूतीसाठी डॉक्‍टरांनी रविवार (ता. 25) दिवस दिला होता. त्यामुळे घरात नवीन पाहुणा येणार म्हणून भोर कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. पण, तुषार याची प्रकृती मंगळवारी (ता. 20) अचानक बिघडली. त्याला सुरवातीला भोसरीच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये व त्यानंतर पुण्याच्या केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याला कावीळ झाली होती. त्याच्या उपचारासाठी भोर कुटुंबीय व नातेवाइकांची धावपळ सुरू होती. डॉक्‍टरांकडूनही प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती. कुटुंबीयांनी मुंबईतील डॉक्‍टरांना पाचारण केले होते. पण, दुर्दैवाने रविवारी सकाळी तुषार कोमात गेला. त्याची मृत्यूशी झुंज सुरू झाली.

दरम्यानच्या काळात आळेफाटा येथील दवाखान्यात अंकिता हिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. रविवारी (ता. 25) रात्री दहाच्या सुमारास अंकिता आणि तुषार यांना एक गोंडस मुलगा झाला. तुषारने बाळाला पाहावे, अशी अंकिताची इच्छा होती. पण, रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास तुषार जीवनाची लढाई हरला आणि भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात असू अशा या कुटुंबाची अवस्था झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT