पुणे

सुट्टीनंतर कांद्याची आवक निम्म्याने घटली दरात मात्र सुधारणा नाही ’

CD

SLC26B27915
सोलापूर ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेला कांदा.

सुट्टीनंतर कांद्याची आवक निम्म्याने घटली

दरात मात्र सुधारणा नाही; सोलापूर बाजार समितीतील चित्र

उ. सोलापूर, ता. १७ : सलग पाच दिवसांच्या सुट्टीनंतर शुक्रवारपासून कांदा बाजार सुरू झाला. सुट्टीपूर्वीच्या तुलनेने बाजारातील आवक निम्म्याने झाली आहे. मात्र दरात अत्यल्प सुधारणा झाली आहे. सध्या कांद्याचे कमाल दर २३०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत आहेत चांगल्या प्रतीचा लाल कांदा सध्या १७०० ते १८००रुपये इतक्या कमी दराने विक्री होत आहे.
सोलापूर शहरातील संक्राती सणानिमित्त होणारी यात्रा व महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बाजार सलग पाच दिवस बंद होता. शुक्रवारपासून परत एकदा कांदा लिलावाला सुरवात झाली. यावेळी ३६२ मालगाड्या कांद्याची आवक झाली होती. शनिवारी ३६७ मालगाड्या कांद्याची आवक झाली. सुट्टी पूर्वी बाजारात दररोज ७०० मालगाड्याच्या जवळपास आवक सुरू होती. मात्र सुट्टीनंतर आवक जवळपास निम्म्यावर आली आहे. मात्र आवक घटल्यानंतरही कांदा बाजारात मंदीचे सावट कायम आहे. गत शनिवारी बाजार समितीच्या आवारात ६८१ मालगाडी कांद्याची आवक झाली होती. यावेळी कमाल २४०० रुपये इतका दर मिळाला होता. आठवड्यानंतरही हाच दर मिळत आहे. सरासरी दरात मात्र शंभर रुपयांची सुधारणा झाली आहे.
कोलमडलेली कांद्याची निर्यात व देशांतर्गत बाजारातील घडलेली मागणी यामुळे चालू वर्षात कांदा उत्पादक मोठ्या नुकसानीत गेले आहे. पुढील महिन्यात बाजारात हरण्या कांद्याची आवक सुरू होणार आहे. यावेळी दरात आणखी घसरण होण्याची भीती आहे. कांदा निर्यातीच्या बाबतीत सरकारने ठोस उपाययोजना न केल्यास परिस्थिती भीषण होणार आहे.


चौकट
शनिवारची कांदा बाजाराची स्थिती
एकूण आवक ३६ हजार ५६० क्विंटल
कमाल दर २४०० रुपये प्रति क्विंटल
सरासरी दर १२०० रुपये प्रति क्विंटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Chinnaswamy Stadium Update: 'आयपीएल' आधीच ‘RCB’ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!, चिन्नास्वामी स्टेडियमबद्दल झाला मोठा निर्णय

Devendra Fadnavis : "कमिशनखोरी अन् उन्माद खपवून घेणार नाही"; फडणवीसांचा पुण्याच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना कडक इशारा!

Horoscope : माघ महिना सुरू होताच 5 राशींचे भाग्य बदलणार; होणार धनलाभ, खूप वर्षांपासूनची इच्छा होईल पूर्ण, नोकरी-धंद्यात मिळेल मोठे यश

DGCA strict action against Indigo : ‘डीजीसीए’चा ‘इंडिगो’ला मोठा दणका!, हजारो उड्डाणे रद्द प्रकरणी केली कडक कारवाई

Ration Card Limit: गरजूंसाठी आनंदाची बातमी! रेशन कार्डसाठी उत्पन्न मर्यादा वाढवली; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT