Solar power project implemented in Srinivas sankul First Project on Katraj Kondhwa Road 10 lakhs annual savings pune Sakal
पुणे

Pune News : श्रीनिवास संकुलमध्ये साकारणार सौरऊर्जा प्रकल्प; कात्रज कोंढवा रस्त्यावरील पहिला प्रकल्प; 10 लाखांची होणार वार्षिक बचत

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील श्रीनिवास संकुल गृहरचना सोसायटीमध्ये सौरऊर्जा निर्मीती प्रकल्प साकारण्यात येणार

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील श्रीनिवास संकुल गृहरचना सोसायटीमध्ये सौरऊर्जा निर्मीती प्रकल्प साकारण्यात येणार आहे. कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील हा पहिलाच प्रकल्प असल्याने याबाबत नागरिकांमध्ये कुतूहल आहे. प्रकल्पासाठी एकूण २३ लाख रुपयांचा खर्च येणार असून या प्रकल्पाच्या माध्यमांतून सोसायटीची वार्षिक दहा लाख रुपयांची बचत होणार आहे.

हा प्रकल्प ४४ किलोवॅट विजनिर्मीतीचा असून या संस्थेची गरज ही ४० किलोवॅट विजेची आहे. या गृहरचना संस्थेत एकूण १४० सदनिका आहेत. एकत्रित जागेसाठी आणि पाण्याची मोटार आदींसाठी लागणाऱ्या विजेची गरज या माध्यमांतून भागविण्यात येणार आहे. या कामाची निविदा देण्यात आलेल्या कंपनीकडून ९० टक्के विजबिल बचतीची हमी घेतली आहे.

सद्स्थितीत दरमहा संस्थेला ९५ हजार रुपयांचे विजबिल येत असून हे कमी होऊन ९० टक्क्यांपर्यंत बचत होणार असल्याचे या गृहरचना संस्थेच्या संचालक मंडळाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन नुकतेच माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभाकर कदम, संतोष धुमाळ, अशोक नहार, अध्यक्ष मंगेश भगत यांच्यासह सोसायचीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी बँकानी गृहनिर्माण सोसायट्यांना अर्थिक सहाय्य गरजेचे आहे. मात्र, त्या अनुषंगाने कोणतीही बँक सहाय्य करत नाही. किमान सहकारी बंँका किंवा राष्ट्रीयकृत बँकांनी ज्या संस्थांचे कन्व्हेन्स डीडी झाले आहे त्यांना किंवा ज्या बँकेत संस्थेचे खाते आहे त्यांना कागदपत्रांची तपासणी करुन अर्थिक सहाय्य करणे गरजेजे आहे.

अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी बँकानी अर्थिक सहाय्य केल्यास अनेक सोसायच्या असे प्रकल्प राबविण्यासाठी पुढे येतील. - मंगेश भगत, अध्यक्ष, श्रिनिवास संकुल गृहरचना संस्था, कात्रज-कोंढवा रस्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात, १४४ वर्षांची आहे परंपरा

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT