पुणे

आंबेगावमधील पंधरा हजार शेतकरी उतरणार रस्त्यावर, का ते वाचा सविस्तर

डी. के. वळसे-पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे पिककर्ज रक्कम नियमितपणे भरणाऱ्या 15 हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अजूनही  50 हजारांचा लाभ देण्यात आला नाही. नेहमीच कर्जाची रक्कम थकवणारे यांनाच सरकार मदत करते, पण नियमित कर्जफेड करणाऱ्या जाहीर करूनही अजून मदत न मिळाल्यामुळेमध्ये शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे आहे. नियमित कर्ज भरणारे शेतकरी लवकरच मंचर येथील प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत, असा निर्वाणीचा इशारा लोणी गावचे माजी सरपंच उद्धव लंके यांनी दिला आहे.

ते म्हणाले आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक मंचर येथे लवकरच आयोजित केली जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक व भरलेल्या रकमेचा तपशील ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून विविध सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अवजारे खरेदीसाठी व पिक कर्ज पुरवठा केला जातो. रब्बी आणि खरीप हंगामात मिळणाऱ्या कर्जामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी खते औषधे, बियाणे खरेदी, शेती अवजारे खरेदी करता येतात. विविध सहकारी सोसायटी मार्फत जिल्हा बँकेतील उचललेले कर्ज अनेक शेतकऱ्यांनी निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे भरले नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थकीत झालेले कर्जदार शेतकऱ्यांचे कर्जाला शासनाच्या वतीने कर्जमाफी देण्यात आली. परंतु नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सहाय्य म्हणून दिले जातील. असे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. मात्र अजूनही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेली नाही.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढे लंके म्हणाले, ''शेतकऱ्यांना पीक कर्जाबरोबरच विहीर, पोल्ट्री, दूध व्यवसाय, शेती पाणीपुरवठा योजना, शेती अवजारे खरेदीसाठी कर्ज दिले जाते. या माध्यमातून शेतकरी सावकाराच्या जाचातून मोकळा झाला आहे. नियमित कर्ज भरल्याने  सोसायटीला दरवर्षी नफा मिळतो. त्यामुळे सोसायटी स्वतः इमारत बांधू शकते त्याचप्रमाणे सभासदांना लाभांश वाटप करू शकते. गावाच्या विकासातही सहकारी सोसायट्यांची योगदान पणे सर्वकाही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच होते, याचाही सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शेतकरी रस्त्यावर उतरणार नाहीत त्यासाठी ताबडतोब प्रशासनाने नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रश्न मार्गी लावावा.''

(संपादक : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT