solved the problem of food for the businessmen who came for the fair in lohgav and stud 
पुणे

अन् अखेर जत्रेसाठी आलेल्या व्यवसायिकांच्या जेवणाचा सुटला प्रश्न

सकाळवृत्तसेवा

पुणे : लोहगाव येथील जत्रा कोरोनामुळे रद्द झाल्यानंतर तेथे अडकून पडलेल्या आकाश पाळणा व इतर खेळण्यांच्या व्यवसायिकांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले होते. मात्र 'सकाळ'ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर 'आशा' प्रतिष्ठानने धान्य पुरवून भोजनाची व्यवस्था केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जत्रा रद्द झाल्याने तेथे उभे केलेले आकाश पाळणे यासह मोठी खेळणी उतरवली जात असताना लाॅकडाऊन झाले. काही व्यवसायिक निघून गेले, तर तीन कुटुंब खेळणी सांभाळण्यासाठी तेथे राहिले. त्यांच्याकडचे पैसे संपले, धान्य संपले त्यामुळे उमेश पाटील या टँकरचालकाने स्वत: तीन कुटूंबातील १२ जणांची जबाबदारी घेऊन त्यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था केली. मात्र पाटील यांनाही हा खर्च परवडत नव्हता. याबाबत 'सकाळा' मधून वृत्त प्रकाशित झाले. त्याची दखल घेऊन आशा प्रतिष्ठानने या व्यावसायिकांना १५ दिवसांच्या किराणा सामानाची किट दिली. यावेळी अध्यक्ष अंजली लोणकर, पुरुषोत्तम डांगी, राजकुमार पिसाळ, प्रसन्न पवार, गणेश नगरकर उपस्थित होते. 


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
"आशा प्रतिष्ठानने शहरातील झोपडपट्टीत धान्य वाटप केले आहे. लोहगाव येथील या कुटुंबांची अवस्था वाईट होती. त्यांना धान्याचे किट दिल्याने भोजनाचा प्रश्न सुटला आहे." असे पुरुषोत्तम डांगी यांनी सांगितले.

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

SCROLL FOR NEXT