पुणे

धक्कादायक : प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईला मुलानेच प्रेयसीच्या मदतीने संपवलं

सकाळवृत्तसेवा

केसनंद : प्रेयसीच्या मदतीने आईचा निर्घृण खून करुन दुसऱ्यानेच खून केल्याचा बनाव करणारा मुलगा व त्याच्या प्रेयसीला लोणीकंद पोलीसांनी काही तासांतच जेरबंद केले. 

खून झालेल्या महिलेचे नाव सुशिला राम वंजारी (वय ३८, रा. माने वस्ती, वढू खुर्द, ता. हवेली) असे असून याप्रकरणी पोलिसांनी मुलगा विशाल राम वंजारी (वय १९, रा. माने वस्ती, वढू खुर्द, ता.हवेली)  व त्याची प्रेयसी नॅन्सी गॅबेरिअल डोंगरे (वय २६) या दोघांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज पहाटे तीनचे सुमारास वढु खुर्द (ता. हवेली) हद्दीत माने वस्ती येथे सुशिला वंजारी हि महिला मृतावस्थेत पडली असल्याची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली.

या घटनेबाबत मृत सुशिला यांचा मुलगा विशाल वंजारी याने लोणीकंद पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पहाटे अडीचच्या सुमारास सुशिला वंजारी हिला उसणे पैशाच्या कारणावरून संशयित शिवा देशमुख (रा. जालना, पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) याने शस्त्राने वार करून ठार मारले असावे. अशा आशयाची फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. मात्र फिर्यादी, साक्षीदार यांचे परस्पर विसंगत जबाब व परिस्थितीजन्य पुरावा तसेच तंत्रशुध्द तपासातून हा गुन्हा मृत महिलेचा मुलगा फिर्यादी विशाल राम वंजारी व त्याची प्रेयसी नॅन्सी गॅबेरिअल डोंगरे (वय २६) यांनी मिळून केल्याचे तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करुन खोटी फिर्याद दिल्याचे निष्पन्न झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमवारीही (ता. ८) आरोपी विशाल याने आईचे १५,५०० रूपये चोरले या कारणावरून दोघांमध्ये दुपारी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून विशाल याने प्रेयसी नॅन्सी हीचे सोबतीने आई सुशिला वंजारी यांचा धारदार चाकूने अनेक वार करून राहत्या घरातच खून करून आईचे प्रेत घराबाहेरील ओटयाजवळील पायरीवर आणून टाकले. आणि दुसऱ्या कोणीतरी खून केला असावा, असा बनाव करून पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र वरीष्ठांच्या  मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिसांनी चाणाक्षपणे तपास करून काही तासातच हा गुन्हा उघडकीस आणला.

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील तसेच वरिष्ठ पोलीस निरिक्षक पद्माकर घनवट, लोणीकंदचे निरीक्षक प्रताप मानकर यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाच्या सुचना दिल्या. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे करीत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

Palghar Bribery case: पालघरमध्ये आरोग्य अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, 35 हजार स्विकारत हाेते अन् काय घडलं!

Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Malkapur Accident: कंटेनरखाली चिरडल्याने दुचाकीस्वार ठार; मलकापूरजवळ अपघात, कंटेनरच्या वेगानं हाेत्याचं नव्हतं झालं!

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

SCROLL FOR NEXT