Sound System
Sound System Sakal
पुणे

साऊंड व्यावसायिक अडचणीत; शासनाकडून मदतीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) दीड वर्षांपासून बहुतांश व्यवसायांना (Business) मोठा फटका (Loss) बसला आहे. त्यातील काही व्यवसाय सावरत आहेत, मात्र साऊंड, (Sound) लाइट (Light) व्यवसायाला अद्याप चालना मिळालेली नाही. सध्या हे व्यावसायिक व अवलंबून असलेले कर्मचारी आर्थिक अडचणीत (Problem) आले आहेत. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत (Financial Help) करावी, अशी मागणी पुणे साऊंड अँड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशनने केली आहे. (Sound Professional in Trouble Demand for Financial Assistance Government)

आज सर्व स्तरातील गरजूंना मदत होत असताना हे व्यावसायिक मात्र मदतीच्या प्रतिक्षेत आहेत, अशी भूमिकाही मांडण्यात आली.

याबाबत असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजू कांबळे म्हणाले, ‘पुण्यात साऊंड, लाइट, जनरेटरचे सुमारे पाच ते सहा हजार व्यावसायिक आहेत. या व्यवसायांवर २० ते २५ हजार कामगार अवलंबून आहेत. यामध्ये साऊंड इंजिनिअर, मदतनीस, इलेक्ट्रिशियन आदींचा समावेश आहे. मात्र कोरोनामुळे सर्व कार्यक्रमांवर बंदी असल्याने उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे घराची जबाबदारी, साऊंड-लाइट सारख्या उपकरणांच्या खरेदीसाठी बँकेचे हप्ते, व्याज, कर्मचाऱ्यांचे पगार अशा अनेक गोष्टींचा खर्च भागविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने या व्यावसायिकांकडे लक्ष केंद्रित करत हा व्यवसाय पूर्वपदावर येईपर्यंत आर्थिक मदत म्हणून कर्जाचे व्याज माफ करावे, किंवा बँकेचे हप्ते काही काळासाठी पुढे ढकलावेत.’

  • व्यवसाय बंद असल्यामुळे मानसिक ताण

  • बहुतांश व्यावसायिक चाळिशीच्यावर आहेत

  • नव्याने दुसरा व्यवसाय सुरू करण्यात अडचणी

  • नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक भांडवल नाही

  • तर काही व्यावसायिकांनी हा व्यवसाय बंद केला आहे

कोरोनामुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. नव्याने कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नाही. त्यामुळे आता शासनाने लक्ष द्यावे. घेतलेल्या कर्जासाठी सवलती द्याव्यात. आता गणपती उत्सव जवळ आला असून मंडळांनी व्यावसायिकांकडे लक्ष दिल्यास काही प्रमाणात व्यवसायाला चालना मिळेल.

- प्रशांत उरुणकर, साऊंड व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT