Sp-College
Sp-College 
पुणे

स. प. महाविद्यालयात साकारणार स्किल हब

सकाळवृत्तसेवा

पुणे - विद्यार्थ्यांना नव्या युगाची कौशल्ये देण्यासाठी स्किल हब, रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजकता विकास कक्ष, प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्यासाठी ऑन-डिमांड लर्निंग आणि सोशल स्टार्टअप या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने घेतला आहे.

महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच स्वायत्तता बहाल केली आहे. त्याअंतर्गत त्यांना पाच कोटी रुपये आणि उद्योजकता विकासासाठी ५० लाख रुपये मिळणार आहेत. त्याचा विनियोग कसा केला जाईल, यासंदर्भात शिक्षण प्रसारक मंडळीने आज पत्रकारांना माहिती दिली. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, सदस्य केशव वझे, सतीश पवार, ॲड. मिहीर प्रभुदेसाई, जया किराड, प्राचार्य डॉ. दिलीप सेठ आणि प्राध्यापक या वेळी उपस्थित होते. 

जैन म्हणाले, ‘‘कला शाखेच्या विद्यार्थ्यांना उद्योगाची कोणतीच संधी उपलब्ध नसते, असा समज असतो. परंतु त्यांना सोशल स्टार्टअपद्वारे ही संधी देण्यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे. विज्ञान शाखेचा विद्यार्थी असेल, तर त्याच्याकडील ज्ञानाच्या आधारेही त्याला कंपनी वा स्वयंरोजगार सुरू करता यावा म्हणून स्किल हबच्या माध्यमातून त्याला प्रशिक्षित केले जाणार आहे.’’
डॉ. सेठ म्हणाले, ‘‘संशोधन आणि विकास सुविधा अधिक उत्तम करण्याबरोबर रोजगारासाठी आवश्‍यक अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. हे अभ्यासक्रम स्वायत्त असले, तरी त्याचा दर्जा उच्च असेल. विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी प्राध्यापकही सक्षम असला पाहिजे, यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणार आहे.’’

रमाबाई हॉलचे सुशोभीकरण
महाविद्यालयातील ‘लेडी रमाबाई हॉल’ला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचे सुशोभीकरण करणार आहे. जुनी रचना कायम ठेवून अंतर्गत व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे. यात बैठक व्यवस्था बदलणार असून, त्याला सुसज्ज सभागृहाचे रूप येणार असल्याचे सतीश पवार आणि जया किराड यांनी सांगितले.

मोदींच्या हस्ते ऑनलाइन उद्‌घाटन
देशातील स्वायत्त महाविद्यालये, विद्यापीठांतील उद्योजकता विकास व संशोधन केंद्रे, रिसर्च पार्कचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. श्रीनगर येथून ते ऑनलाइन पद्धतीने रविवारी (ता. ३) या केंद्रांचे उद्‌घाटन करतील. त्यात स. प. महाविद्यालयातील केंद्राचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT