Special Article on BJP victory in Maharashtra Vidhansabha 2019 
पुणे

मिळणार, सत्ता मिळणार पण... | Election Results 2019

मृणालिनी नानिवडेकर

शेटजी भटजींचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात गेल्यावेळी 123 जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष झाला तेव्हा ते मोदींच्या त्सुनामीचे फळ मानले जात होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये यश मिळू लागले तेव्हा भाजप महाराष्ट्राचा प्रमुख राजकीय पक्ष ठरल्याचे राजकीय निरीक्षक मानू लागले. भाजपची भूक मोठी असल्याने त्यांना चतकोराने सुख मिळत नव्हते. बाहेरच्या पक्षातले आमदार, खासदार आपल्याकडे घेण्याचा चंग भाजपने बांधला आणि त्यामुळेच निकालांनी भाजपला काहीसा फटका दिला. भाजप आज पुन्हा एकदा क्रमांक एकचा पक्ष ठरला तर आहे; पण, गेल्या वेळेपेक्षाही कमी जागा जिंकून. 

कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय, सत्तेत त्यांना न मिळालेला वाटा आणि "पार्टी विथ डिफरन्स' या बिरुदावलीशी घेतलेली फारकत ही यामागची कारणे असावीत. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाने दिग्गजांना उमेदवारी नाकारली. जनता आपल्याला स्वीकारेल याचा आत्मविश्‍वास बाळगला पण तो काहीसा फाजील होता, हे निकालांनी दाखवून दिले आहे.

महाराष्ट्रात भाजपला दिवाणखान्यातून बाहेर नेत जनमानसात रुजवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येलाही या निकालांनी पराभवाची चव चाखायला लावली आहे. त्याशिवाय एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी यांनाही पराभूत व्हावे लागले. भाजपची अजस्र निवडणूक यंत्रणा आणि प्रत्येक मतदाराशी संपर्क साधणारे पन्नाप्रमुख लोकसभा निवडणुकीत ठिकठिकाणी दिसत होते; पण विधानसभेत मात्र ते दिसलेच नाहीत. पक्ष प्रचंड आत्मविश्‍वासात वावरत असताना जमिनीशी संपर्क ठेवू शकला नाही काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

पक्षासमोर सत्ता मिळणार असली तरी, मोठी आव्हाने उभी झाली आहेत. बंडखोरांना बरोबर घेऊन भाजप नवे सरकार निश्‍चित स्थापन करेल; पण पक्षविस्तार आणि पक्षसंघटनेसमोरची आव्हाने मात्र या निकालाने अधिकच व्यापक केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : ९ फूट लांबीच्या अजगराचे थरारक रेस्क्यू; धारावीतील नॅचरल पार्क परिसरात सर्पमित्र पोलिसाची धाडसी कामगिरी

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

Solapur politics: अजय दासरींनी युवती सेनेत लुडबूड करू नये: शिवसेना ठाकरे युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, पक्षात राहूनच पक्षाशी गद्दारी!

SCROLL FOR NEXT