निर्माल्य संकलनासाठी ‘स्वच्छ’ची बुधवारपासून पुण्यात विशेष मोहीम
निर्माल्य संकलनासाठी ‘स्वच्छ’ची बुधवारपासून पुण्यात विशेष मोहीम  sakal
पुणे

निर्माल्य संकलनासाठी ‘स्वच्छ’ची बुधवारपासून पुण्यात विशेष मोहीम

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका, स्वच्छ पुणे आणि कमिन्स इंडिया हे एकत्रितपणे 'निर्माल्य टू निसर्ग ' शहरात यंदाही राबवित आहेत. याअंतर्गत नागरिकांकडून निर्माल्य संकलन करण्यास 'स्वच्छ'च्या कचरा वेचक बुधवारपासून (ता. १५) सुरवात करणार आहेत. हे निर्माल्य महापालिका नैसर्गिकरित्या जिरवणार आहे.

गणेशोत्सवात भाविकांनी वाहिलेल्या फुले, हार, दुर्वा यांसारख्या नैसर्गिकरित्या जिरवल्या जाऊ शकणाऱ्या निर्माल्याचे योग्य मार्गाने विघटन व्हावे आणि त्यातून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने शहरात गेल्या ११ वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान निर्माल्य संकलन केले जाते. यामध्ये स्वच्छ संस्थेचे कचरा वेचक नागरिकांकडून निर्माल्य गोळा करतात व मनपाकडे प्रक्रियेसाठी देतात. कमिन्स इंडियाच्या माध्यमातून निर्माल्य गोळा करण्यासाठी लागणारी पोती कचरा वेचकांना उपलब्ध करून दिली जातात.

उपक्रमाविषयी माहिती देताना स्वच्छ संस्थेचे आलोक गोगटे म्हणाले,‘‘गणेशोत्सव हा पुण्यातील सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा उत्सव आहे. त्याचे सांस्कृतिक महत्व जपण्यासोबत शहराच्या पर्यावरणाचे देखील संवर्धन ‘निर्माल्य टू निसर्ग’ सारख्या उपक्रमातून होत आहे. यंदा हा उपक्रम १२ सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. नागरिकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. गेल्या तीन वर्षात, पुणे महानगरपालिकेसोबत काम करून २८६ टन निर्माल्य यशस्वीपणे गोळा करून ते इतर प्रकारच्या कचरा व्यवस्थापन प्रणालीत जाण्यापासून स्वच्छच्या कचरा वेचकांनी रोखले आहे.

पूर्वी कचरा वेचक नदीकाठी थांबून निर्माल्य गोळा करत असत. परंतु, कोव्हिडच्या प्रादुर्भावानंतरही न थांबता दारोदारी जात हा उपक्रम राबविण्यात कचरा वेचकांना मोठे यश मिळाले आहे." ११५ व २० सप्टेंबर रोजी देखील आपल्याकडील निर्माल्य कचरा वेचकांना द्यावे असे आवाहन 'स्वच्छ' तर्फे करण्यात आले आहे.

नागरिकांनी असे करावे

  • घरातील निर्माल्याचे वेगळे संकलन करावे

  • १५ ते २० सप्टेंबर दरम्यान स्वच्छचे कचरा वेचक ते संकलन करणार

  • निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टींचा समावेश असावा.

  • प्लास्टिक, थर्माकोल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मुर्त्या किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ निर्माल्यात नको.

  • निर्माल्य नदी, विहिरी किंवा नाल्यांमध्ये टाकू नका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT