Crime_Firing
Crime_Firing 
पुणे

पोलिस अॅक्शन मोडमध्ये; गावठी कट्टा विकणाऱ्यांना भरला दम

सकाळ वृत्तसेवा

शिरूर (पुणे) : गावठी कट्टा बाळगून धाक दाखविणाऱ्या, प्रसंगी गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या आणि एकूणच गोळीबारांच्या प्रकरणात या ना त्या कारणाने संबंधित असलेल्या कट्ट्याचा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिस दल 'ॲक्शन मोड' मध्ये आले आहे. बुधवारी (ता.१०) विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी या सर्व गावठी कट्टा विकणाऱ्यांना तीव्र शब्दांत सज्जड दम भरला आहे. 

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वाढती रिव्हॉल्वर संस्कृती मोडून काढण्याचा 'ॲक्शन प्लॅन' पोलिसांनी तयार केला असून, या दहशतीच्या संस्कृतीचा खात्मा करण्यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे, असे लोहिया यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. वार्षिक तपासणीनिमित्त, त्यांनी बुधवारी (ता.१०) शिरूर पोलिस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली.

ते म्हणाले, ''सप्टेंबर २०२० ला विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून चार्ज घेतल्यानंतर सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचे बारकाईने निरीक्षण करीत आहे. गतवर्षीच्या तुलनेत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गुन्हेविषयक कामगिरी खूपच सरस आहे. जिल्हा पोलिस दलाने अवैध हत्यारे जप्ती, गुंडांची धरपकड, मोक्कांतर्गत कारवाई आणि झोपडपट्टी दादांच्या मुसक्या आवळण्यात खूपच जोर पकडला आहे. महत्वपूर्ण कारवाया, गुन्ह्यांना प्रतिबंध यावर लक्ष केंद्रीत केले आहे. एमपीडीए अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राधान्याने प्रस्ताव दाखल केले जात असून, हे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याबाबत पोलिसांकडून पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

गावठी पिस्तुल कनेक्शन मध्यप्रदेशातील सेंधवापर्यंत जात असल्याचे आम्ही रेकॉर्डवर घेतले आहे. त्यासाठी प्रशासकीय चौकटीतून तपास करण्याबरोबरच, थेट घटनास्थळापर्यंत वैयक्तिक जाऊन पाहणी केली आहे. घनदाट जंगल, रेंज प्रॉब्लेम आणि संशयित सातत्याने जागा बदलत असल्याच्या इतर काही अडचणी आहेत. परंतु ते अडथळे पार करून घोडेबाजांच्या मुळापर्यंत जाऊन पाळेमुळे खणून काढली जातील. रिव्हॉल्वर संस्कृतीवर जरब बसविण्यासाठी यातील गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीएच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाईल, असे लोहिया यांनी सांगितले.

वार्षिक तपासणीनिमित्त शिरूर पोलिस स्टेशनची पाहणी करताना अपूऱ्या बळाचा मुद्दा पुढे आला. सर्वसाधारण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खूप कमी बळावर कामकाज करावे लागत आहे. पोलिस नाईक, पोलिस हवालदार आणि सहाय्यक फौजदार यांची संख्या खूपच कमी आहे. कमी पोलिस दलाचा परिणाम प्रशासनावर निश्चीतपणे होत असून, याची दखल घेऊन तातडीने काही तपास अंमलदार सर्वच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिल्या आहेत. यातून विविध गुन्ह्यांतील तपासाचे बर्डन बऱ्यापैकी कमी होण्यास हातभार लागेल. त्यातून गुन्हे प्रतिबंधासाठी आणखी बळ मिळेल.
- मनोजकुमार लोहिया, विशेष पोलिस महानिरीक्षक

पोलिस बदल्यांबाबत शासनाच्या नियमावलीनूसारच निर्णय घेतले जात आहेत. तथापि, एकाच तालुक्यात सहा किंवा बारा वर्षांपासून असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांबाबत काही निर्णय विचाराधीन आहेत. त्यात प्रशासनासमोर काही आव्हाने असली; तरी त्या आव्हानांचा विचार करूनच कायद्यानूसार निर्णय घेतले जातील. तरीही बरीच वर्षे एकाच ठिकाणी राहिलेल्या पोलिस कर्मचाऱ्याबाबत चुकीच्या गोष्टी आढळल्यास, ते चुकीच्या बाबींना थारा देत असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच गुंड-गुन्हेगारांच्या संगतीत वावरत असतील असे दिसून आले, तर संबंधित ठाण्याचे पोलिस निरीक्षक, डीवायएसपी, अतिरिक्त एसपींमार्फत नजर ठेवली जाईल. पोलिस कर्मचारी गुंडांशी जवळीक वाढवित असतील, तर ते अजिबात सहन केले जाणार नाही, असेही विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT