Pune_Police_SPO 
पुणे

'एसपीओ' ठरताहेत पोलिसांचा 'आधार'; कंटेन्मेंट झोनमध्ये पार पाडली मोठी जबाबदारी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आम्ही दररोज नागरिकांना त्यांनी सार्वजनिक शौचालये वापरताना काय काळजी घ्यावी, स्वच्छता कशी ठेवावी, मास्क, सॅनिटायझरचा सातत्याने वापर कसा करावा, इथपासून ते गरोदर माता, आजारी व्यक्ती, वृद्धांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना वेळोवेळी समजावून सांगणे, सर्दी, ताप असणाऱ्या व्यक्तींना किंवा कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्यांना तत्काळ रुग्णालयात जाण्यास सांगणे, त्यांच्या नोंदी ठेवणे तसेच आरोग्य व पोलिस प्रशासनाला सतर्क करणे अशी कित्येक कामे गेली दोन महिने जीव धोक्‍यात घालून 'विशेष पोलिस अधिकारी' (एसपीओ) म्हणून कार्य करणारे गौतम सवाणे सांगत होते. रिक्षाचालक सवाणे, सामाजिक कार्यकर्ते सुजीत यादव यांच्यासह अभियंते, संगणक अभियंते, वकील, नोकरदार असे विविध क्षेत्रातील सुमारे सहा हजार 'एसपीओ' कोरोना योद्धे शहराच्या कंटेन्मेंट झोनमध्ये कार्यरत आहेत, तेही कोणत्याही अपेक्षेशिवाय!

शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर दिवसेंदिवस पोलिसांवरील दैनंदिन काम, विशेष बंदोबस्त, अन्य कामे, यामुळे पोलिसांवरील ताण वाढत चालला होता. तसेच शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी नियंत्रण करण्यात पोलिसांनाही मर्यादा येऊ लागल्या होत्या. या पार्श्‍वभुमीवर पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी शहरातील काही नागरीकांना अटी व शर्ती घालून त्यांना तात्पुरत्या स्वरुपात 'विशेष पोलिस अधिकारी' हे पद देऊन पोलिसांच्या मदतीसाठी येण्याचे आवाहन केले. त्यानुसार, शहरामधील वेगवेगळ्या भागातील कोरोना प्रतिबंधीत क्षेत्रात 5 हजार 813 जणांना 'एसपीओ' म्हणून नेमणूक करण्यात आली. बेरोजगार, रिक्षाचालक, सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते अभियंते, संगणक अभियंते, नोकरदारही पोलिसांच्या मदतीसाठी पुढे आले. 

दरम्यान, 'एसओपी'चा पहिला प्रयोग कोरोनाचा सर्वाधिक प्रादूर्भाव असणाऱ्या ताडीवाला रोड झोपडपट्टीमध्ये राबविण्यात आला. तेथील 'एसपीओ'नी चांगले सहकार्य करीत विविध प्रकारची कामे दररोज केली जात आहेत. स्थानिक नागरीकांशी असणारा निकटचा संबंध, एकमेकांवरील विश्‍वास व मदतीच्या भावनेमुळे 'एसपीओ'ना नागरीकांकडून चांगले सहकार्य केले जात आहे. तसेच त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आवाहनालाही नागरीक सकारात्मक प्रतिसाद देत असल्याने पोलिसांचा बराचसा ताण कमी होण्यास मदत झाली असल्याचे अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी सांगितले. 

डॉ. शिंदे म्हणाले, ''विशेष पोलिस अधिकाऱ्यांनी कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग पासून ते शौचालयामध्ये स्वच्छता ठेवणे, वृद्धांना आधार देऊन त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे अशी अत्यंतिक महत्वाची कामे केली. एसपीओ'मुळे पोलिसांना केवळ चांगली मदतच झाली नाही, तर पोलिसांवरील कामाचा ताण देखील कमी झाला. परिमंडळ एक, परिमंडळ तीनमधील 'एसपीओं'नी केलेले काम उल्लेखनीय आहे.'

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 'एसपीओ' करत असलेली कामे :
* वस्त्या, सोसायट्यांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती
* सोशल डिस्टंसींगपासून ते मास्क, सॅनिटायझर वापराबाबत मार्गदर्शन
* वृद्ध, गरोदर माता, लहान मुले, आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे
* संशयित कोरोनाबाधीत किंवा होम क्वारंटाईन व्यक्तींवर लक्ष ठेवणे
* पोलिस, महापालिका व आरोग्य विभागाच्या संपर्कात राहून त्यांना सतर्क करणे
* नागरीकांना किराणा, भाजीपाला, औषधे घरपोच वितरीत करणे

उच्चशिक्षित 'एसपीओं'नी पार पाडली अशी जबाबदारी :
* अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून 'कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग' करणे.
* परप्रांतीय कामगारांची परतीच्या प्रवासासाठीची माहिती वेबसाईटवर भरणे.
* परप्रांतीय कामगारांना जेवण, निवास, वाहन व्यवस्थेसारख्या सुविधा देणे.
* तब्बल 25 हजार कामगारांची माहिती वेबसाईटवर भरणे.

'एसओपी'चे प्रशासनाला झालेले फायदे :
* कोरोनाबाधीत किंवा कोरोना संशयितांचा शोध घेणे सोपे
* पोलिसांवरील अतिरीक्त कामाचा ताण 'एसओपी'मुळे कमी
* जनजीवन सुरळीत ठेवण्यास मोलाची मदत
* स्थानिक नागरीकांकडून 'एसओपी'च्या शब्दांना मान
* कोरोनाचा प्रादूर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी मदत

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT