SPPU-Exams 
पुणे

पुणे : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षेचे फॉर्म भरण्यास झाली सुरवात!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षांच्या लेखी परीक्षेसाठी १९ मे  ते २८ मे या कालावधीत परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. यापूर्वी ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

पुणे विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांची लेखी परीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. त्यामुळे ज्या पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले नाहीत, त्यांना अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर महाविद्यालयाने तो विद्यापीठाकडे इनवर्ड केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल. 

या संपूर्ण प्रकियेत कुठल्याही प्रकारचे विलंब अथवा अतिविलंब शुल्क सद्यस्थितीत विशेष बाब म्हणून आकारले जाणार नाही. त्यामुळे त्याचा दिलासा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र, त्यांनी यापूर्वी विलंब अथवा अतिविलंब शुल्क भरून अर्ज केले आहेत त्या विद्यार्थ्यांना शुल्क परतावा देण्यासाठी स्वतंत्रपणे परिपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे, असे विद्यापीठाने परिपत्रकात नमूद केले आहे.

- Big Breaking : दहावी-बारावीच्या परीक्षा होणार जुलैमध्ये; वेळापत्रक जाहीर!

अंतिम वर्षाचीही परीक्षा रद्द करा; विद्यार्थ्यांची मागणी
दरम्यान, राज्य सरासरने पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम सत्र/वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर यास विद्यार्थी आणि संघटनांकडून विरोध सुरू झाला आहे. पुणे, मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार /याऐवजी पूर्वीच्या सत्रांच्या मूल्यमापनावरून सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, या मागणीने जोर धरला आहे. यासाठी ऑनलाईन स्वाक्षरी मोहिमेत आतापर्यंत ५५ हजार विद्यार्थ्यांनी यास पाठिंबा दिला आहे. 

'कोरोना'मुळे विद्यापीठ परीक्षांचे वेळपत्रक कोलमडल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आणि राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यापीठांना परीक्षा घेण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील केवळ अंतीम सत्र/अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. तर इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील सुमारे ८ लाख विद्यार्थी जुलै महिन्यातील परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam Fraud : अंजनगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्याला अटक; परीक्षा कस्टडी रूमवर आढळला गैरप्रकार, शिक्षण विस्तार अधिकारी फरार

Taliban Airstrikes on Pakistan : रावळपिंडी ते क्वेटा, तालिबानने उद्धवस्त केले पाकचे लष्करी तळ, एअर स्ट्राईकला प्रत्युत्तर

महेश मांजरेकर पुन्हा रंगमंचावर ! ‘अ‍ॅनिमल’ नाटकातून मांडणार मुंबईतील तरुणांच्या स्वप्नांचा संघर्ष

Holi Stock Market Holiday: होळीला 'या' तारखेला शेअर बाजार बंद राहणार! मार्चमध्ये आणखी किती सुट्ट्या?

स्वत:ला भारताचा पंतप्रधान घोषित केलं, गुन्हा दाखल होताच फरार; पोलिसांनी फॉर्च्युनर केली जप्त

SCROLL FOR NEXT