Savitribai-Phule-University sakal
पुणे

SPPU : प्राध्यापकांच्या रिक्त पदांबद्दल कुलगुरूंनी व्यक्त केली खंत

स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजवंदनानंतर कुलगुरू डॉ.नितीन करमळकर बोलत होते

सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशातील एक पुढारलेले विद्यापीठ म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (SPUP) नावलौकिक आहे. एकेकाळी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड (oxford) समजले जाणाऱ्या या विद्यापीठात शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असून, कित्येक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. याचा थेट परिणाम शिक्षण आणि संशोधनावर होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत मोहोत्सवी ध्वजवंदनानंतर कुलगुरू डॉ.नितीन करमळकर (nitin karmalkar) यांनी अभिभाषण केले. यामध्ये वर्षभरातील कामांचा आढावा घेत असताना, त्यांनी विद्यापीठातील अपुऱ्या मनुष्यबळाविषयी खंत व्यक्त केली.

डॉ. करमळकर म्हणाले,"विद्यापीठातील शिक्षकांची पदे रिक्त असून, शिक्षकेत्तर कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर निवृत्त होत आहे. असे असतानाही विद्यापीठाने सर्व क्रमवारीत आघाडी घेतली आहे. शिक्षकांची भरती होणे गरजेचे असून, राज्य सरकारसोबत बोलून त्या संबंधी प्रयत्न करण्यात येत आहे."

विद्यापीठात सध्या नवनवे अभ्यासक्रम सुरू होत आहे. अशा वेळी अपूर्ण शिक्षण संख्येचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील त्याच बरोबर राज्यातील शिक्षक भरती होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयांत एकूण क्षमते पैकी फक्त ४० टक्के सहाय्यक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक यांची कायम स्वरूपी पदे भरलेली आहे. सुमारे ६० टक्के पदे विनाअनुदानित आणि तासिका तत्वावर भरण्यात आली आहेत. तर बहुतेक ठिकाणी शिक्षकांची पदे वाढविणे गरजेचे आहे. पण त्याबद्दल कोणतीच पाऊले उचलण्यात आली नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Nagpur Garage Fire: नोकरीवरून काढल्याच्या रागातून गॅरेजला आग!; २० दुचाकी जळाल्या; माजी कर्मचाऱ्यावर संशय, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

वीर पहाडियाचा रोमँटिक अंदाज, आफिया सय्यदचं पदार्पण; ‘प्रेम कीटाणू’ ठरतोय तरुणाईचा सिनेमा?

SCROLL FOR NEXT