Spraying in pune
Spraying in pune 
पुणे

Coronavirus : पुण्यात ९५० ठिकाणी पालिकेकडून फवारणी

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरांतील सरकारी, निमसरकारी इमारतींसह लोकवस्ती असलेल्या सोसायट्यांत निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांत मोकळ्या जागांसह लोकवस्त्या असलेल्या ९५० ठिकाणी औषध फवारणी केली असून, रहिवाशी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.

दरम्यान, बुधवारी झालेल्या पावसामुळे काही लोकवस्त्या आणि रस्त्यांवर पाणी साचले असून, ते काढण्याच्या ४५ तक्रारींवर महापालिकेने कार्यवाही केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर चकाचक करण्याच्या दूष्टीने विविध ४२ प्रभागांत क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून यंत्रणा उभारली आहे. त्यासाठी टँकर, पंप आणि त्या-त्या भागानुसार कामगार उपलब्ध केले आहेत. पहिल्या टप्प्यात पडीक जागांवरील कचरा उचलून त्याठिकाणी हायड्रोक्लोराइडची फवारणी केली आहे. त्यापाठोपाठ महापालिकेचे कामगार राहात असलेल्या जुन्या इमारती आणि त्यांचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावर यांनी सांगितले.

शहरातून गेल्या पाच दिवसांत औषध फवारणीची मागणी वाढली आहे. त्यामळे टप्प्याटप्प्यांत सर्वत्र फवारणी करण्यात येत आहे. काही भागांतील बैठी घरे आणि झोपड्यांना प्राधान्य दिले आहे. जिथे लोकांची वर्दळ होती, तिथे फवारणी पूर्ण केली आहे.
- डॉ. संजीव वावर, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT