पुणे

...तर पूर्व हवेलीत कोरोनाचा धुमाकूळ अटळ

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : कोरोनाची साखळी तोडल्याशिवाय पूर्व हवेलीमधील कोरोनाची साथ आटोक्यात येणार नाही. त्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा शोध घ्यावा व त्यास सक्तीने क्वारंटाईन करा. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घ्या. अन्यथा यापुढील काळात पूर्व हवेलीत कोरोना धुमाकूळ घालेल असा इशारा मुख्यमंत्री व उपमुख्यंमंत्री कार्यालयाचे आरोग्य सल्लागार व भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचे माजी सदस्य डॉ. सुभाष साळुंखे यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे दिला. 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरण्याबरोबरच, सोशल डिस्टन्स राखण्याची गरज आहे. कोरोनापासुन मुक्ती हवी असेल तर तोडण्यासाठी आरोग्य विभाग, पोलिस दल, ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी मरगळ झटकून एकत्रित काम करावे लागेल. कोरोनाची साखळी तुटल्याशिवाय कोरोनापासुन मुक्ती नाही, असेही डॉ. सुभाष साळुंखे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पूर्व हवेलीमधील कोरोनाची साथ रोखण्यासंदर्भात विचारविनामय करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने लोणी काळभोर ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. सुभाष साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभाग, पोलिस व ग्रामपंचायत प्रशासन यांची संयुक्त बैठक सोमवारी (ता. २९) दुपारी पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. साळुंखे यांनी वरील इशारा दिला. 

यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खऱात, पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, थेऊरच्या मंडल अधिकारी गौरी तेलंग, लोणी काळभोरचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव, लोणी काळभोरच्या सरपंच अश्विनी गायकवाड, उपसरपंच राजाराम काळभोर, अण्णासाहेब काळभोर, योगेश काळभोर, राजेंद्र काळभोर, गणेश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय पवार आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, कोरोना बाधीत रुग्नांची मागिल सात दिवसातील संख्या लक्षात घेता, पुर्व हवेलीची स्थिती अतिशय चिंताजणक आहे. कोरोना बाधीत रुग्नाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची स्वॅब चाचनी करुन, त्यास क्वारंटाईनसक्तीचे करणे गरजेचे आहे. या शिवाय कोरोना बाधीत रुग्न राहत असलेल्या भागाला कटेंटमेन्ट जाहीर करुन, संबधित ठिकाणची काळजी घएम्याची गरज आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्नाच्या संपर्कात आलेले अनेक जण राजरोसपणे फिरत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ही बाब गंभीर आहे.

यापुढील काळात मात्र आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस यांनी एकत्रित येऊन कारवाई करण्याची गरज आहे. कोरोनाची साखळी तोडल्याशिवाय पुर्व हवेलीमधील कोरोनाची साथ आटोक्यात येणार नाही असेही डॉ. साळुंखे यांनी शेवटी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT