mate1.jpg
mate1.jpg 
पुणे

श्रीशिवछत्रपती क्रिडा अवॉर्ड विजेते महेश मते यांचे निधन

सकाळवृत्तसेवा

खडकवासला (पुणे) : येथील महेश शहाजीराव मते (वय ५४) यांचे हृदयविकाराने आज शनिवारी निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याचा आज मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आई, वडील, दोन सख्खे भाऊ नातवंड असा परिवार आहे. 

खडकवासला येथील सरपंच सौरभ मते हे त्यांचे चुलत भाऊ होत. त्यांना कुस्ती व ज्यूदो खेळाची खूप आवड होती. 1987मध्ये खडकवासला गावचे ते सरपंच होते.
ज्यूदो क्रीडा प्रकारामध्ये 1985-86 साली राज्य सरकारने क्रीडा विभागातील मानाचा श्रीशिवछत्रपती क्रिडा अवॉर्ड मिळाला होता.

संजय गव्हाणे यांच्याकडे त्यांनी ज्यूदोचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील शहाजीराव मते हे खडकवासला गावातील तंटामुक्ती समितीचे पहिले अध्यक्ष होते. त्यांनी तीन चार वर्षांपूर्वी खडकवासला येथे ज्यूदो खेळाचा हॉल उभारला आहे. त्यात सध्या ४० जण ज्यूदोचे प्रशिक्षण देत होते.


पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

वडगाव बुद्रुकचे योगेश दांगट हा त्यांचा शिष्य त्याला देखील 2005- 06मध्ये श्रीशिवछत्रपती क्रिडा अवॉर्ड विजेता होण्यास त्यांचा मोठा हातभार होता. हवेली तालुक्यात 100 हून अधिक जणांना त्यांनी ज्यूदो, कुस्ती मधील राष्ट्रीय खेळाडू घडविले. खेळ, राजकारणासह ते प्रगतशील शेतकरी व उद्योजक होते. खडकवासला परिसरात त्यांनी 2003 पासून पॉली हाऊस उभारून जरबेरा, अंथेरीयमसह अनेक फुला- फळांची आधुनिक शेती करीत होते. तसेच, खडकवासला परिसरात त्यांनी पेट्रोल डिझेल पंप सुरू केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर खडकवासला स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT