ST-Bus.jpg
ST-Bus.jpg 
पुणे

एसटी भाड्याने घ्या : प्रशासनाचा आग्रह

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी लग्न, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहलींसाठी प्रासंगिक करारावर एसटी बस देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रत्येक विभागीय पातळीवर अधिकारी व पर्यवेक्षकांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे. तसेच, प्रत्येक आगाराला प्रासंगिक कराराचे उद्दिष्ट निश्‍चित करून दिले जाणार आहे. 

राज्य परिवहन महामंडळाचा महसुलाचा प्रमुख स्रोत तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न आहे; पण त्याचबरोबर प्रासंगिक करार, जाहिराती, गाळे भाडेतत्त्वावर देणे अशा विविध मार्गांनीही महसूल मिळतो. मागील काही वर्षांपर्यंत लग्नकार्य, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहलींसाठी प्रामुख्याने एसटीला प्राधान्य दिले जात होते. यातून एसटीला मोठा महसूल मिळायचा; पण शाळांच्या सहलीसाठी एसटीच्या गाड्या देण्यासाठी अनेक अटी घातल्या होत्या, त्यामुळे महसुलात घट झाली. त्यामुळे एसटीने पुन्हा प्रासंगिक करारावर भर देत उत्पन्न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रशासनाने विभागीय स्तरावर मागील आर्थिक वर्षात झालेल्या प्रासंगिक कराराचा आढावा घेऊन ज्या शैक्षणिक संस्थांनी यापूर्वी प्रासंगिक करारावर एसटी बस घेतली होती, अशा संस्थांशी संपर्क साधून बस उपलब्ध करून द्याव्यात. ज्या शैक्षणिक संस्थांनी यापूर्वी एसटी महामंडळाची बस वापरलेली नाही, त्यांनाही बस वापरण्याची परवानगी द्यावी, आदी सूचना एसटी प्रशासनाने दिल्या आहेत. प्रासंगिक करारावर बस उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही मार्ग बंद राहणार नाहीत, तसेच कामासाठी अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतही महामंडळाने विभागीय अधिकाऱ्यांना कळविले आहे. 

दरवर्षी प्रासंगिक करारावर बस दिल्या जातात. शिक्षण मंडळाने जाचक अटी घातल्याने शाळांच्या सहलींसाठी बस देताना अडचण झाली होती. यंदा त्या संदर्भातील उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. 
- यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ 

काय आहेत उपाययोजना 
- विभागीय पातळीवर अधिकारी व पर्यवेक्षकांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक 
- शैक्षणिक सहलींबाबत उपाययोजना 
- कोणतेही मार्ग बंद राहणार नाहीत 
- विविध संस्थांशी संपर्क साधणार 
- लग्न, यात्रा, धार्मिक स्थळांनाही प्राधान्य 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT