पुणे

एसटी महामंडळाच्याही आता "ई-बस' 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात "पीएमपी'च्या ई-बसला मिळत असलेली लोकप्रियता बघून एसटीनेही हा कित्ता गिरविण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यापासून सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूर या मार्गांवर एसटीच्या ई-बस अल्पावधीत धावणार आहेत. पुणे विभागीय कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. 

राज्यात सर्वाधिक ई-बस पीएमपीच्या ताफ्यात आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटी महामंडळानेही आता ई-बस वापरण्याचे ठरविले आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या सध्या सुमारे 20 हजार बस आहेत. 50 ई-बस पुण्यापासून सुमारे 250 किलोमीटरच्या अंतरावरील मार्गांवर धावतील. कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूरच्या एसटीचे अधिकारी पुण्यात आले होते. त्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती पुणे विभागाच्या नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. 

स्वारगेट आगारात आता ई-बससाठी चाजिंग स्टेशन बसविण्यात येणार आहे; तर चारही मार्गांवर त्या-त्या ठिकाणच्या एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयांच्या अखत्यारित असलेल्या आगारांत चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. एकदा चार्जिंग झाल्यावर बस सुमारे 225 ते 250 किलोमीटर धावू शकते. त्यामुळे चार्जिंग करून बस परत येऊ शकते. तीन महिन्यांत याबाबतची प्रक्रिया पूर्ण होईल. 

"शिवाई' नामकरण... 
एसटी महामंडळातर्फे नव्याने सुरू होणाऱ्या ई-बसला "शिवाई' नाव देण्याचाही निर्णय या बैठकीत झाला. या बस वातानुकूल असतील. कोणतीही दरवाढ न करता प्रवाशांना या बसचा वापर करता येईल. यापूर्वी "शिवनेरी' आणि "शिवशाही' बस एसटीच्या ताफ्यात आहेत. आता "शिवाई'चाही समावेश झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोयना धरणातून सांडव्यावरील विसर्ग बंद; पायथा विद्युतगृहातून १,०५० क्युसेक पाणी सुरू

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT