st employee 
पुणे

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा निर्णय मुंबईतल्या बैठकीत

मिलिंद संगई

बारामती, ता. 1- राज्यातील एसटीच्या कर्मचा-यांच्या रखडलेल्या प्रश्नासंदर्भात येत्या चार पाच दिवसात मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्याची माहिती एसटीच्या संघटनेचे सचिव हनुमंत ताटे व केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. 

बारामतीत या दोघांनी आज पवार यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. एसटी कर्मचा-यांच्या रखडलेल्या वेतनाबाबत तसेच त्या मुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा झाली असून येत्या चार पाच दिवसात या बाबत मुंबईत बैठकीचे आयोजन करणार असल्याची ग्वाही पवार यांनी दिल्याचे या दोन्ही नेत्यांनी सांगितले. 

दरम्यान एसटी कामगारांच्या बिकट झालेल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी अजित पवार यांनी विशेष लक्ष घालावे तसेच एसटी महामंडळास दोन हजार कोटी आर्थिक साहाय्य करावे, यासाठी या आधीही मान्यताप्राप्त संघटनेने पत्र व्यवहार केलेला असल्याचे त्यांनी सांगितले. 

एसटीवर अवलंबून कामगारांची संख्या व एसटीचे योगदान विचारात घेत राज्याच्या जीवनवाहिनीचे राज्यशासनात विलीनीकरण करण्याबाबतही निवेदनात आग्रही मागणी करण्यात आली आहे. एसटीच्या कर्मचा-यांचे पगार रखडलेले असल्याने अनेक कर्मचा-यांवर गवंडीकामासह, भाजीपाला विक्री करणे किंवा खाजगी वाहनांवर चालक म्हणून जाण्याची पाळी आली आहे. अनेकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. त्या मुळे या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालण्याची या नेत्यांची मागणी होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान अजित पवार यांनी या संदर्भात बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिलेली असल्याने हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा हनुमंत ताटे व संदीप शिंदे यांनी व्यक्त केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात ४८ तास धोक्याचे! मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यासह विदर्भावर वादळी पावसाचं संकट; १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Trimbakeshwar Temple Scam : पैसे घेत थेट मंदिरात प्रवेशाचा पुरावाच हाती; कडलग बंधूंच्या संभाषणाचे CDR एसआयटीकडे, उत्तर दरवाज्यामागचं काळं सत्य समोर!

Mumbai: ‘अग्निवीर’प्रकरणी न्यायालयाचे केंद्राला खडेबोल; प्रतिज्ञापत्र का सादर केले नाही?

Latest Marathi News Live Update : शालार्थ प्रकरणात शिक्षकांना दिलासा, थकित वेतन देण्याचे न्यायालयाचे आदेश

Vidarbha News: वणी परिसरात दुर्मिळ जीवाश्मांचा शोध; पृथ्वी दिनानिमित्त महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT