पुणे

पुणे : एसटीच्या 'इनऍक्टिव्ह' पदाधिकाऱ्यांवर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दापोडी येथील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील सात अधिकाऱ्यांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत त्यांची बदली करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत असूनही अकार्यक्षम असणारे अधिकारी आणि कर्मचारी एसटी महामंडळाच्या रडारवर आले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 

संबंधित अधिकाऱ्यांची प्रशासकीय चौकशीही सुरू करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. या बदल्यांमुळे एसटी प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. एसटीच्या राज्यभरातील मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये, आगार या ठिकाणी अनेक अधिकारी-कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. मात्र, तरीही ते अकार्यक्षम असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मध्यवर्ती कार्यालयाच्या एका बदली आदेशानुसार अनेक वर्षे एकाच ठिकाणी असलेल्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेतील सात अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

तसेच त्यांना तातडीने नव्या ठिकाणी रुजू होण्यास सांगून त्यांची प्रशासकीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. मध्यवर्ती कार्यालयाने काढलेल्या बदली आदेशामुळे अनेक प्रस्थापितांना धक्का देण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रशासनाची कार्यक्षमता आणि उत्पन्न वाढीसाठीचे कसून प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यभरातील अशा अनेक एसटीच्या कार्यालयांमध्ये वेगळ्या कारणांनी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवरही ही कारवाई केली जाणार आहे. त्याची सुरूवात दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेपासून करण्यात आल्याचे एसटी महामंडळाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मध्यवर्ती कार्यशाळेतील बदली करण्यात आलेली अधिकारी (कंसात सध्याचे पद)

प्रियदर्शिनी वाघ (भांडार अधिकारी), अजितसिंह राजपूत (सहायक अधीक्षक), अंकुश रेणके (सहायक अधीक्षक), विजय सोनवणे (सहायक भांडारपाल), अमिर गुलाब सय्यद (सहायक भांडारपाल), संजय यादव (प्रमुख कारागीर), मिलिंद तिकोने (सहायक कारागीर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

SCROLL FOR NEXT