Pune-University 
पुणे

कामावर परत या; कर्मचारी अन् अधिकाऱ्यांना पुणे विद्यापीठाचे आदेश!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लाॅकडाऊनच्या काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक कर्मचारी, अधिकारी मुख्यालय सोडून दुसऱ्या गावांमध्ये गेले आहेत. या सर्वांनी सोमवार (ता.१८) पर्यंत विद्यापीठात हजर राहावे, असे आदेश विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत.

'कोरोना'चा प्रतिबंध करण्यासाठी लाॅकडाऊन सुरू झाल्यावर पुणे विद्यापीठाच्या आवारात राहणारे अनेक कर्मचारी, अधिकारी विद्यापीठ सोडून बाहेर गेले आहेत. ज्यांना बाहेर जायचे होते त्यांनी परवानगी घेऊन विद्यापीठ सोडणे अपेक्षीत होते. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे २०० जण पुण्याबाहेर आहेत. त्याचा परिणाम विद्यापीठाच्या कामकाजावर होत आहे. 

या कर्मचारी आणि अधिकारी यांना परत येण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने ते तिकडेच अडकून पडले आहेत. त्यामुळे  विद्यापीठाने यासंदर्भात पत्र दिले, तर आम्हाला पुण्यात परत येता येईल, अशी विनंती प्रशासनाला केली होती. 

पुणे विद्यापीठात परीक्षा, नवीन शैक्षणिक वर्ष, अभ्यासक्रम यासह इतर महत्त्वाची कामे सुरू आहेत. अशा काळात विद्यापीठात राहणाऱ्यांची गरज पडत आहे. त्यामुळे लाॅकडाऊन किंवा संचारबंदीत मुख्यालय सोडून इतर ठिकाणी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १७ मे पर्यंत परत यावे आणि कामावर रूजू झाल्याचा ई-मेल करावा असे आदेश दिले आहेत. 

याबाबत कुलसचिव प्रफुल्ल पवार म्हणाले, "मुख्यालय सोडून बाहेर गेलेल्या कर्मचारी, अधिकारी यांनी परत येण्यासाठी परिपत्रक काढले आहे. प्रवासाचा परवाना मिळविण्यासाठी कर्मचारी, अधिकारी यांना त्यांच्या ओळखपत्रासह हे परिपत्रक उपयुक्त ठरेल.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT