Stall at wakdewadi Sealed by Encroachment Department of Ghole Road Regional Office 
पुणे

घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभागाने स्टॉल केले सील; हे आहे कारण?

सकाळवृत्तसेवा

खडकी बाजार(पुणे):  पुणे मुंबई मार्ग वाकडेवाडी व्होडाफोन कार्यालयाजवळ असलेले सात ते आठ स्टॉल घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करून कुलूप सील केले. स्टॉल परवाना ज्यांच्या नावाने आहे त्यांनी हे स्टॉल भाडेतत्वावर दिले असल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली असल्याची माहिती अतिक्रमण अधिकाऱ्यांनी दिली आहे.            

पुणे मुंबई मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला महापालिकेने व्यावसायिक स्टॉलला परवाने दिले आहेत, मात्र ज्यांना हे परवाने दिले गेले त्यांनी स्वतः व्यवसाय करण्याची अट महापालिकेने परवाना देताना घातली असून देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॉल भाडेतत्वावर देण्याचे धाडस काही स्टॉल धारकांनी केले. महापालिकेच्या लक्षात येताच आपला फौजफाटा घेऊन पुणे-मुंबई मार्गावर सोमवारी ( ता.५) संध्याकाळी चार वाजण्याच्या दरम्यान पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण साबळे व कर्मचाऱ्यांनी व्होडाफोन कार्यालयाजवळ स्टॉल धारकांनी कागदपत्र तपासणी केली, तेव्हा या परिसरातील फक्त एकच स्टॉल धारक स्वतः व्यवसाय करताना आढळला बाकीच्या सर्व स्टॉल धारकांनी स्टॉल भाड्याने दिले असल्याचे समोर आले. तेव्हा  अधिकाऱ्यांनी त्वरित स्टॉल बंद करून कुलूप सील केले. यापुढेही पुणे शहरात सर्वत्र कारवाई सुरू असणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

                   
''पुणे शहरात महापालिकेच्यावतीने गरजू व्यक्तींना कागदपत्रांची पूर्तता करून व्यवसाय करण्यासठी स्टॉल परवाने दिले आहेत, मात्र व्यवसाय स्वतः करावा अशी अट असूनही पुण्यात बऱ्याच ठिकाणी स्टॉल भाडेतत्वावर दिले असलयाची माहिती मिळत आहे. त्यामुळे आम्ही वाकडेवाडी येथे समक्ष पाहणी केली असता जास्तीत जास्त स्टॉल भाड्याने दिले असल्याचे समोर आले त्यामुळे येथील काही स्टॉल सील करण्यात आले आहेत. यापुढेही बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या स्टॉल धारकांवर कारवाई करण्यात येईल.'' 

- माधव जगताप,  उपायुक्त, घोलेरोड क्षेत्रीय अतिक्रमण विभाग 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: “गलत करते हो यार…” रोहित शर्मा संतापला; चिमुकलीच्या सुरक्षिततेसाठी पुढे सरसावला, मुंबई विमानतळावर काय घडलं?

राम कपूर अन् साक्षी तंवर यांचा 'तो' बोल्ड सीन; पत्नी गौतमीला कानोकान नव्हती खबर, रात्री समजलं तेव्हा...

Railway News: रेल्वेच्या नियमांमध्ये मोठा बदल! मुलींना आरोग्य लाभ आणि प्रवास पास मिळणार, पण कोणत्या? जाणून घ्या...

Shikhar Dhawan : बांगलादेशमध्ये हिंदू महिलेवर सामूहिक बलात्काराच्या घटनेवर शिखर धवनचा संताप, म्हणाला..

Latest Marathi News Live Update: वार्ड क्रमांक ३४ मधील अपक्ष उमेदवार अरबाज अस्लम शेख यांच्यावर हल्ला

SCROLL FOR NEXT