पुणे

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मोहोळ

सकाळवृत्तसेवा

पुणे - सत्ता ताब्यात घेतलेल्या भारतीय जनता पक्षाशी दोन हात करण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने स्थायी समितीच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घेतल्याने भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड झाली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ‘नथी’तून तीर मारण्याचा शिवसेनेचा प्रयत्नही यानिमित्ताने फसला. 

महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ९८ जागा मिळाल्याने महापौर, उपमहापौरपदासह सर्वच समित्या भाजपच्या पदरात पडल्या. भाजपची एकहाती सत्ता आल्याने विरोधी पक्षांनी अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीपासून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. या पदांच्या दोन्ही काँग्रेसने एकत्र येत आघाडी केली. ‘‘सत्ताधाऱ्यांना मनमानी कारभार करू देणार नाही. पुणेकरांच्या हितासाठी भाजपच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची भूमिका घेत, सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष सुरूच ठेवण्याचे संकेत दिले. महापालिकेतील सर्वच निवडणुकांमध्ये आघाडीचा उमेदवार असेल, असेही जाहीर केले होते.

महापालिकेतील महत्त्वाच्या स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसने एकत्र येत, रेखा टिंगरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या पदासाठी भाजप आणि आघाडीच्या उमेदवारांत लढत होणार असल्याचे स्पष्ट होते. प्रत्यक्षात मात्र, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आघाडीने माघार घेतल्याची घोषणा केली. विरोधकांच्या या भूमिकेची महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती. राष्ट्रवादी-काँग्रेसने निवडणूक लढविली तर विरोध करू, अशी भूमिका शिवसेनेने मांडली होती. मात्र, त्यांचाही विरोधाचा प्रयत्न फसला.

विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, ‘‘शहराच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका आहे. त्यामुळे माघार घेतली. मात्र, विरोधी पक्ष म्हणून भूमिका कायम राहणार आहे.’’ ‘‘स्थायी समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे आहे. विकासाचा विचार करून निवडणूक लढविली नसल्याचे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले.

ढोल-ताशा वाजवून आनंदोत्सव
महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी माघारीसाठी १५ मिनिटांची वेळ दिली. त्या वेळी आघाडीच्या उमेदवार टिंगरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर पाटील यांनी मोहोळ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. सभागृहातील भाजप आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मोहोळ यांचे अभिनंदन केले. कुटुंबीयांनीही त्यांचे औक्षण केले. फटाके, ढोल-ताशा वाजवून कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली.  
 

पुणेकरांना मजबूत पायाभूत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करणार आहे. शहरात जमा होणाऱ्या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया होण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. तसेच, स्थायी समितीच्या बैठकांना माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार आहे.
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT