google-classroom
google-classroom 
पुणे

भारीच की ! पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून गुगल क्‍लासरूम सुरू 

सकाळवृत्तसेवा

पौड : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता दहावीच्या गुणवत्ता वाढ वर्गाचा गुगल क्‍लास रूम सुरू झाली आहे. या क्‍लासमध्ये खेडोपाड्यातील 50 शाळांतील सर्वसामान्य कुटुंबातील 353 विद्यार्थी जोडले गेले आहेत. लॉकडाऊनमुळे संस्थेने ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. 

लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री, संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांनी संस्थेतील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने गुणवत्ता वाढ वर्गाचा गुगल क्‍लास 5 मे पासून सुरू केला. यामध्ये 244 मुली आणि 109 मुले ऑनलाइन जोडली गेली आहेत. संस्थेतील विविध विषयांचे तज्ञ दररोज चार तास मार्गदर्शन करीत आहेत. 

विद्यार्थ्यांना व्हिडिओ तसेच पीपीटीही पाहायला मिळतात. व्यवसाय मार्गदर्शन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले 14 समुपदेशक संस्थेत आहेत. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन समुपदेशनही केले जात आहे. ऑनलाइन वर्गाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

दहावीच्या गुणवत्ता वाढ वर्गामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढतो. जगातील शैक्षणिक स्पर्धेत उतरण्यात हे विद्यार्थी सक्षम होतात. या वर्गात शिकलेले अनेक विद्यार्थी सध्या उच्च पदावर कार्यरत आहेत. लॉकडाऊनमध्येही ऑनलाइन पद्धतीने हा वर्ग चालू असून विद्यार्थ्यांकडूनही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- अॅड. संदीप कदम, मानद सचिव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ. 

 

गुणवत्ता वाढ वर्गामुळे मी गुगल क्‍लासरूम ऍपचा वापर करू शकले. त्यामुळे घर बसल्याही मला माझ्या अभ्यासाविषयी सखोल माहिती मिळत आहे. व्हिडिओ, पीपीटीच्या माध्यमातून धड्यांचे आकलन चांगले होत आहे. ऑनलाइन टेस्टमुळे किती समजले याचीही माहिती होते. दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिल्यामुळे आम्ही सर्वजण संस्थेचे आभारी आहोत. 
-ऋतुजा दाते, विद्यार्थिनी, सरदार पटेल हायस्कूल, अणे 

 

गुगल क्‍लासरूमच्या माध्यमातून संस्थेने आम्हाला दहावीच्या अभ्यासक्रमाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे आमच्यातील आत्मविश्वास वाढला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा विधायक कामासाठी पुरेपूर वापर करण्याची संधीही मिळाली आहे. 
-पार्श्व शहा, न्यू इंग्लिश स्कूल, वाणेवाडी 
 

गुणवत्ता वाढ वर्गाचा गुगल क्‍लासरूम सुरू करून इंटरनेटच्या माध्यमातून खेडोपाड्यातील विद्यार्थीही एकत्र जोडले गेले आहेत. त्यांच्याशी संवाद साधता येतो. त्यांच्या शंकांचे निरसन करता येते. व्हिडिओ, पीपीटी, पीडीएफमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानातही भर पडली आहे. 
-एस. एस. शेख, पर्यवेक्षक, शेलपिंपळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT