MHADA
MHADA  sakal media
पुणे

म्हाडाच्या सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीस शनिवारी (ता. २६) प्रारंभ झाला. सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावर विश्वास असल्यामुळे म्हाडाच्या घरासाठी नागरिक अर्ज करतात. सर्वसामान्य नागरिकांचा हा विश्वास म्हाडाने जपावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सरकारी विश्रामगृह येथे पुणे म्हाडाच्या दोन हजार ७०३ नवीन सदनिका आणि ५८ व्यापारी संकुलासाठी एप्रिल २०२२ मध्ये ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाला. खासदार वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात गरजूंना घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोरोना संकटकाळात मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळाली. सर्वांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. कोरोना कालावधीतही म्हाडाने नागरिकांना घरे उपलब्ध करून दिली. म्हाडामुळे गरजूंच्या घराची स्वप्नपूर्ती होते. सर्व सुविधायुक्त घरे देण्यासोबतच म्हाडाने शहराच्या विकासासाठी आणखी योगदान द्यावे.

म्हाडा ऑनलाइन सोडत वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज नोंदणीस प्रारंभ २६ फेब्रुवारी २०२२

अर्जाची सुरवात २८ फेब्रुवारी २०२२

नोंदणी शेवटची तारीख २९ मार्च २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अर्ज सादर करण्याची तारीख ३० मार्च २०२२ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)

ऑनलाइन पेमेंट स्वीकृती अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)

बॅंकेत आरटीएस किंवा एनइएफटीद्वारे अनामत रक्कम अंतिम तारीख २ एप्रिल २०२२ (बॅंकेच्या कार्यालयीन वेळेत)

उपलब्ध सदनिका

चाकण म्हाळुंगे (इंगळे), दिवे, सासवड ता. पुरंदर, पिंपरी वाघिरे, जुळे सोलापूर, सात रस्ता सोलापूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT