Starting to fill the application form for MHT-CET For Engineering Pharmacy Agriculture 
पुणे

इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषीसाठी ‘एमएचटी-सीईटी’ प्रवेश परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली ‘एमएचटी-सीईटी‘ प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, ही परीक्षा १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल या दोन टप्प्यात होणार आहेत. परीक्षा अर्ज व इतर सर्व माहिती ‘महासीईटी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षेसाठी ७ जानेवारी ते २९ फेब्रुवारी या कालावधी देण्यात अर्ज करता येणार आहेत. ज्यांना या मुदतीत अर्ज करता आले नाहीत त्यांना विलंब शुल्कासह १ ते ७ मार्च या दरम्यान अर्जासाठी मुदत आहे. परीक्षेचे शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे, असे राज्य सीईटी सेलचे आयुक्‍त संदीप कदम यांनी नमूद केले आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी ५५० जणांनी अर्ज केले असून, त्यातील १८९ अर्ज पूर्ण भरून जमा केले आहेत. 

एमएचटी-सीईटी १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल अशा दोन टप्प्यांत सकाळी आणि दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे. दरम्यान, त्याचे वेळापत्रक चार महिने आधीच सीईटी सेलने जाहीर केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. या प्रवेश परीक्षेचे अर्ज, वेळापत्रक यासह इतर माहिती  www.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  नोंदणी व अर्जासाठी मुदत : २९ फेब्रुवारीपर्यंत
  विलंब शुल्कासह अर्जाची मुदत : १ ते ७ मार्च
  परीक्षा - १३ ते १७ एप्रिल , २० ते २३ एप्रिल 
  निकाल  ३ जून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Accident : भीषण रेल्वे दुर्घटना! मालगाडी अन् पॅसेंजर ट्रेन भिडल्या; अनेक प्रवाशांचा मृत्यू

२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान! निवडणुकीचा कार्यक्रम कसा, आचारसंहितेचा नियम काय, अर्ज कसा करायचा, मतदारांना मोबाईल नेता येणार नाही

Kalyan News: कल्याण शीळ रोडवर २ दिवस वाहतुकीत बदल, 'असे' असतील पर्यायी मार्ग

Latest Marathi News Live Update : अजित पवार गटाची उत्तर महाराष्ट्रमधील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

Winter Birds: थंडीची चाहूल लागताच पाहुणे पक्ष्यांचे आगमन; जाणून घ्या सोलापूरमध्ये कुठे आणि कसे पाहाल पक्षीवैभव!

SCROLL FOR NEXT