मुंढवा - मिडास आंत्रप्रेन्युअरशिप इन्स्टिट्यूटतर्फे शनिवारी मुंढवा येथील कॅम्पसमध्ये ‘मिडास बझार’चे आयोजन केले होते. यामधील उत्पादनाची विद्यार्थ्याकडून माहिती घेताना अभिजित पवार, शेजारी पराग शहा.
मुंढवा - मिडास आंत्रप्रेन्युअरशिप इन्स्टिट्यूटतर्फे शनिवारी मुंढवा येथील कॅम्पसमध्ये ‘मिडास बझार’चे आयोजन केले होते. यामधील उत्पादनाची विद्यार्थ्याकडून माहिती घेताना अभिजित पवार, शेजारी पराग शहा. 
पुणे

स्टार्टअप कंपन्यांसाठी ‘डीसीएफ व्हेंचर्स’ - अभिजित पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘स्टार्टअप कंपन्यांना मदत करण्याची ‘सकाळ माध्यम समूहा’ची भूमिका आहे. त्यासाठी ‘डीसीएफ व्हेंचर्स’च्या माध्यमातून सुयोग्य स्टार्टअपना भांडवलासाठी मार्गदर्शन आणि स्थैर्य देण्याचे काम आम्ही करीत आहोत,’’ असे ‘एपी ग्लोबल’चे चेअरमन आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी शनिवारी येथे सांगितले.

मिडास आंत्रप्रेन्युअरशिप इन्स्टिट्यूटतर्फे मुंढवा कॅम्पसमध्ये ‘मिडास बझार-३’चे आयोजन केले होते, त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ‘मिडास’चे संस्थापक आणि मुख्य सल्लागार पराग शहा आणि व्यवस्थापकीय संचालिका पूजा शहा उपस्थित होते.

‘स्टार्टअप कंपनी सुरू करणे म्हणजे सायकल शिकण्यासारखे आहे. सुरवातीला तुम्ही अपयशीही होऊ शकता. इस्राईलमध्ये जगातील सर्वाधिक स्टार्टअप कंपन्या आहेत. तेथे अपयश साजरे केले जाते आणि अशा स्टार्टअपना अतिरिक्त निधी पुरविला जातो. भारतामध्ये अपयश मान्यच होत नाही. अपयश ही यशाकडे नेणारी पायरी आहे, असे आपण मानत नाही. ही मानसिकता बदलली पाहिजे,’’ असे पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘स्टार्टअपसाठी पूरक व्यवस्था आम्ही डीसीएफ व्हेंचर्सच्या माध्यमातून बनवतो आहोत. विशिष्ट आर्थिक क्षमतेपर्यंत पोचणाऱ्या स्टार्टअपसाठी सर्वतोपरी मार्गदर्शनाची ही व्यवस्था आहे. यातून निर्माण होणाऱ्या स्टार्टअपना प्रोत्साहनाचे काम ‘सकाळ’ करतो आहे.’’

पराग शहा यांच्या कामाचे पवार यांनी काैतुक केले. पूजा शहा यांनी इन्स्टिट्यूटविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘मिडास’च्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्राहकांशी थेट संवाद साधता आला. ‘मिडास’ ही एक बदलाची प्रक्रिया असून, यशाची भरारी घेणाऱ्यांना बळ दिले जाते.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT