Startup employees pay their salary for the donating food to needy
Startup employees pay their salary for the donating food to needy 
पुणे

स्टार्टअपच्या कर्मचाऱ्यांनी गरजूंच्या अन्न व्यवस्थेसाठी दिला आपला पगार

सकाळवृत्तसेवा

पुणे : रिपोस एनर्जी या स्टार्टअपच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी 'लेंड अ हँड' हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्टार्टअपच्या सर्व कर्मचाऱ्यांना आपला एक महिन्याच्या पगार देण्याचे ठरविले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सध्या राज्यात लॉकडाऊनमुळे अनेक स्टार्टअप्समध्ये अस्थिरता निर्माण झाली असून कित्येक जागी आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांना सुद्धा काढण्यात येत आहे. दरम्यान अशा परिस्थितीत सुद्धा चेतन व अदिती वाळुंज यांनी आपल्या स्टार्टअप कर्मचार्यांच्या सहाय्याने ही मोहीम हाती घेतली आहे.

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास
या मोहिमेचा अंतर्गत कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मदतनिधीच्या माध्यमातून पुढील एक महिना गरजू कुटुंबाना जेवण व जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच यासाठी पोलिसांकडून सर्व प्रकारच्या परवांग्या घेण्यात आल्या आहेत व एकूण दहा स्वयंसेवक गरजूंना ही मदत पोहोचविणार असल्याची माहिती रिपोस एनर्जीच्या सहसंचालिका अदिती वाळुंज यांनी दिली.

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास
‘कर्मचाऱ्यांकडून आम्ही साधारण सात लाख रुपये गोळा केले आहेत. तसेच कंपनीतर्फे देखील आम्ही दोन लाख रुपये या मोहीमेसाठी दिले आहेत. आता पर्यंत याचा लाभ पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे ९०० परिवारांना मिळाला आहे."
- चेतन वाळुंज, संचालक - रिपोस एनर्जीचे  

coronavirus : पुणे जिल्ह्यातील 'ही'; २० तपासणी केंद्रे सुरू राहणार २४x७
"आपल्याकडे या कठीण काळात लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व गोष्टी आहेत. मात्र रोजंदारीवर काम करणारे मजूर व इतर गरजू लोकांकडे काहीच नाही व त्यांना या क्षणी मदतीची गरज आहे."
- सुमित देशमुख, स्टार्टअपचे कर्मचारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT