state government given period of one year to winning gram panchayat candidates to submit their caste validity certificate esakal
पुणे

Caste Validity Certificate : जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासस आता वर्षांची मुदत

राज्य सरकारचा निर्णय ः गाव कारभाऱ्यांना मोठा दिलासा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गावगाडा हाकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून गाव कारभारी बनलेल्या राखीव प्रवर्गातील विजयी उमेदवारांना आता त्यांचे जात वैधता प्रमाणत्रत्र सादर करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी राज्य सरकारने दिला आहे.

यामुळे हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पुर्वीच्या तुलनेत आणखी सहा महिन्यांचा जास्त कालावधी मिळाला आहे. यामुळे केवळ मुदतीत हे प्रमाणपत्र सादर न केल्याने अनेक गाव कारभारी हे अपात्र ठरत असत आणि त्यांच्या पदावरून पायउतारही होत असत.

या नव्या मुदतवाढीमुळे केवळ या प्रमाणपत्राच्या मुद्यावरून कोणालाही गाव कारभारी पदावरून पायउतार व्हावे लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयाने विविध राखीव संवर्गातून सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्यांना कारभाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने याआधी गेल्या वर्षीच्या (२०२१) निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. पुर्वीच्या तरतुदीनुसार हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कमाल सहा महिन्यांची मुदत मिळत असे.

या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट) मिळणे तसे मोठे जिकिरीचे काम झाले होते. अनेकांना तर या मुदतही ते मिळविता येत नसे. परिणामी जनतेतून निवडून येऊनही केवळ जात वैधता प्रमाणपत्रांमुळे त्यांना हे पद गमवावे लागत असे. या मुदतवाढीमुळे आता राखीव संवर्गातून निवडून आलेल्या सरपंचांना किंवा ग्रामपंचायत सदस्यांना त्यांचे पद गमवावे लागणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनुसुचित जाती (एस. सी.), अनुसुचित जमाती (एस.टी.) भटक्या जाती, जमाती (व्ही.जे.एन. टी.) किंवा नागरिकांच्या (ओबीसी) प्रवर्गातून विजयी झालेल्या उमेदवारांना निवडणूक निकालानंतर पुर्वी सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. ते आता एक वर्षाच्या आत सादर करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT