The state government has directed that parents of disabled students should also be involved in the school management committee 
पुणे

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांचाही असणार शाळा व्यवस्थापन समितीत सहभाग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आतापर्यंत शाळा व्यवस्थापन समितीत  क्वचितच एखाद्या शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांचा सहभाग असायचा. मात्र आता शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता आवश्यकतेनुसार तिथे या विद्यार्थ्यांच्या पालकांचा समावेश असावा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

बालकांचा मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. मात्र, आता या समितीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांचा समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे आला होता. त्याला राज्य सरकारने मान्यता दिली असून त्याप्रमाणे आता समितीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना आवश्यकतेनुसार प्रतिनिधित्व दिले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. 

कायद्यानुसार प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे आवश्यक असते. या समितीत ७५ टक्के पालकांचा सहभाग असतात. पालकांसह स्थानिक लोक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांचा समावेश असतो. 

'शाळा समितीत आवश्यकतेनुसार दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक असल्यास या विद्यार्थ्यांच्या गरजा ते अधिक चांगल्या पद्धतीने शाळेसमोर मांडू शकतील. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे मत समाधान माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी पालक म्हणाले, शाळा समितीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांचा समावेश झाल्यास या विद्यार्थ्यांची बाजू शाळेसमोर अधिक सक्षमपणे मांडणे शक्य होणार आहे. मात्र हे प्रत्यक्षात येण्यासाठी पावले उचलली गेली पाहिजेत."


संपादन - सुस्मिता वडतिले 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

SCROLL FOR NEXT