Ajit Pawar Sakal
पुणे

ॲमिनीटी स्पेसच्या विषयात राज्य सरकार हस्तक्षेप करेल; अजित पवार

भाजपने पुणे महापालिकेच्या 270 अॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर आणला असला तरी त्यास सर्व पक्षांचा विरोध होत आहे.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - भाजपने (BJP) पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) 270 ॲमेनिटी स्पेस (Aminity Space) भाड्याने (Rent) देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर आणला असला तरी त्यास सर्व पक्षांचा विरोध होत आहे. त्यातच आता ॲमेनिटी स्पेस चा विषय शहराच्या हिताचा नसेल तर त्यास विरोध करा, भाजपने बहुमताच्या जोरावर विषय मंजूर केला तर त्यात राज्यसरकार हस्तक्षेप करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेतली. या बैठकीत आगामी निवडणूक, पक्षाचे संघटना, शहराचा विकास या अनुषंगाने चर्चा झाली. या बैठकीत ॲमेनिटी स्पेसचा मुद्दा देखील उपस्थित झाला. या प्रस्तावास राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा द्यावा यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केली.

ॲमेनिटी स्पेस ३० वर्ष भाड्याने देऊन त्यामधून महापालिकेला उत्पन्न मिळणार असले तरी यातून नागरिकांच्या हिताचा विचार करावा, यामध्ये पुणेकरांपेक्षा जागा घेणाऱ्यांनाच जास्त फायदा होणार असेल तर त्याचा विरोध झाला पाहिजे. ॲमिनीटी स्पेसच्या या प्रस्तावाबाबत शहरातील दोन्ही आमदार, माजी महापौर, माजी नगरसेवक यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून शहराच्या हिताचा निर्णय घ्यावा. तुमच्या भूमिकेच्या विरोधात भाजपने बहुमतावर विषय मंजूर केला तर राज्य सरकार त्यात हस्तक्षेप करेल, असे पवार यांनी बैठकीत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT